आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफाॅर्मात असलेल्या आर्सेनल क्लबने प्रीमियर लीगमधील आपली विजयी माेहीम कायम ठेवताना यजमान ब्राइटनला धूळ चारली. आर्सेनल क्लबने रविवारी ४-२ ने ब्राइटनवर मात केली. बुकायाे सका (२ रा मि.), मार्टिन ओडेगार्ड (३९ वा मि.), एडि केतियाह (४७ वा मि.) आणि ग्रेब्रियल मार्टिनेलीने (७१ वा मि.) गाेल करून आर्सेनलला माेठ विजय मिळवून दिला. ब्राइटनकडून घरच्या मैदानावर काैरू मिटाेमाे (६५ वा मि.) आणि इवान फर्ग्युसनने (७७ वा मि.) प्रत्येकी एक गाेल केला. मात्र, त्यांना आपल्या टीमचा पराभव टाळता आला नाही. यजमान ब्राइटन क्लबचा १६ सामन्यात हा सहावा पराभव ठरला. इंग्लिश फुटबाॅल क्लब आर्सेनलने लीगमध्ये १४ वा विजय साजरा केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.