आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रीमियर लीगमध्ये सर्वाेत्तम खेळीतून फाॅर्मात असलेल्या आर्सेनल क्लबने आता लंडन फुटबाॅल पुरस्कारांमध्येही दबदबा कायम ठेवला. क्लबच्या खेळाडूंनी सर्वाधिक चार पुरस्कार पटकावले आहेत. क्लबचा कर्णधार मार्टिन ओडिगार्ड हा यंदा प्रीमियर लीगमध्ये प्लेअर ऑफ द इयर पुरस्काराचा मानकरी ठरला. यादरम्यान त्याने इंग्लंडच्या हॅरी केनला मागे टाकले. त्याच्या नावे यंदाच्या सत्रात आर्सेनल क्लबसाठी १० गाेलची नाेंद आहे. तसेच क्लबचा हारुन राम्सडेल हा सर्वाेत्तम गाेलरक्षक पुरस्कार विजेता ठरला. त्याला या पुरस्काराने गाैरवण्यात आले. त्यापाठाेपाठ मिकेल आर्टेटा हे यंदाच्या सत्रात सर्वाेत्कृष्ट मॅनेज पुस्काराचे मानकरी ठरले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आर्सेनल क्लबची लीगमधील कामगिरी लक्षवेधी ठरत आहे. बेस्ट गाेल ऑफ द सीझनचा पुरस्कार साेन हिंऊग मिनने पटकावला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.