आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेला 9 जूनपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचीही निवड करण्यात आली आहे. अर्शदीप हा संघातील एकमेव डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. नोव्हेंबरमध्ये टी-20 विश्वचषक होणार आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या कारकिर्दीबद्दल आणि आतापर्यंतचा प्रवास याबद्दल दिव्य मराठीने त्याच्याशी खास बातचीत केली आहे. वाचा मुलाखत...
प्रश्न- भारतीय संघात तुमची निवड झाल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन, तुम्ही क्रिकेटची सुरुवात कशी केली आणि तुम्ही क्रिकेट सोडून इतर खेळांकडे का गेला नाही?
उत्तर- मी लहान असताना आमच्या आजूबाजूला क्रिकेटचे वातावरण होते. माझाही या खेळाकडे कल वाढला. घरच्यांनी पाहिल्यावर त्यांनी मला अकॅडमीत पाठवले आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला.
प्रश्न- तुमचे वडील CISF मध्ये होते आणि तुमच्या प्रशिक्षकाने सांगितले की ते एका शहरातून दुसऱ्या शहरात बदली करायचे. अशा परिस्थितीत तुम्हीही त्याच्यासोबत शहरे बदललीत की पंजाबमध्ये राहून सर्व प्रशिक्षण घेतले?
उत्तर- यामध्ये माझ्या आईचा सर्वाधिक पाठिंबा मिळाला. ती मला सायकलवर बसवून सरावासाठी घेऊन जायची. सकाळी उठल्यावर ती आधी सगळ्यांसाठी जेवण बनवायची, मग मला चंदीगडपासून 13 किलोमीटर दूर घेऊन जायची, मी सराव करेपर्यंत ती तिथेच बसायची आणि संध्याकाळी परत घेऊन जायची. सलग 4 वर्षे तिने हे काम चालू ठेवले.
प्रश्न- तुमचे वडील CISF मध्ये होते आणि त्यांना वेळ मिळाला नाही, असे तुम्ही सांगितले होते, मग त्यांनी हे सर्व कसे व्यवस्थापित केले?
उत्तर- माझ्या वडिलांनी मला कायम साथ दिली आहे. ते सर्व वेळ माझ्यासोबत असू शकत नाव्हते, पण त्यांना जो काही वेळ मिळाला त्यांनी ते फक्त माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करायचे. मी अंडर-19 पर्यंत काहीही करू शकत नव्हतो, त्यामुळे माझ्या वडिलांनी मला कॅनडाला पाठवायचे ठरवलं होतं. त्यावेळेस मी त्यांना एका वर्षाचा अवधी मागून घेतला आणि त्यांनी मला ती संधी दिली, आता त्याचे परिणाम सर्व काही तुमच्या समोर आहे.
प्रश्न- दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत तू स्वतःला कोणत्या भूमिकेत पाहतोस?
उत्तर- जर मला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संधी मिळाली तर मी माझे 100% देईन. मी माझे सर्व काही पणाला लावीन. मी इथपर्यंत पोहोचलो आहे. याचे सर्व श्रेय देव, माझे प्रशिक्षक आणि पालकांना जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.