आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटीस:अर्शदीपला खलिस्तानी संबोधले; केंद्राची विकिपीडियाला नोटीस

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात झेल सोडल्याने भारतीय संघाचा खेळाडू अर्शदीप सिंगला ऑनलाइन ट्रोलिंगचा सामना करावा लागला. एवढेच नव्हे, तर त्याच्या विकिपीडिया पेजवर त्याला ‘खलिस्तानी’ संबोधण्यात आले. विकिपीडिया हा ऑनलाइन सायक्लोपीडिया आहे, त्यात जगभरातील लोक योगदान देतात. त्यावरील माहिती बदलता येऊ शकते. आता अर्शदीपबाबतची माहिती बदलल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर केंद्र सरकारने कडक भूमिका घेतली आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान (आयटी) मंत्रालयाने विकिपीडियाला नोटीस दिली आहे. मंत्रालयाने विकिपीडियाच्या भारतात तैनात अधिकाऱ्यांना समन्स पाठवून, ‘हा प्रकार कसा झाला?’ अशी विचारणा केली आहे.

बातम्या आणखी आहेत...