आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • As Soon As Sports Started In The United States, Corona Increased Rapidly

खेळाडूंमध्ये कोरोना:अमेरिकेत स्पोर्ट्स सुरू होताच कोरोनाचा धाेका वेगाने वाढला, राष्ट्रीय हॉकी लीगमध्ये पॉझिटिव्ह टेस्ट रेट 5.8; एनबीएमध्ये 7.1 टक्यांची नाेंद

न्यूयॉर्क3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मेजर लीग सॉकर 8 जुलैपासून सुरू; बास्केटबॉल लीग 22 जुलै, बेसबॉल लीग 24 जुलै व हॉकी लीग 1 ऑगस्टपासून

अमेरिकेत विविध खेळांच्या लीग सुरू होताच सर्वांना वाटत होते की, हळूहळू सर्व काही सामान्य होईल. मात्र, गेल्या काही आठवड्यात खेळाडूंमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळत असल्याने खेळाच्या पुनरागमनावर परिणाम होतोय. अमेरिकेत पहिल्यापासून पॉझिटिव्ह प्रकरणे वाढत आहेत. आता खेळ सुरू झाल्याने खेळाडू व कर्मचाऱ्यांमध्ये पॉझिटिव्हची संख्या वाढतेय. पहिले लीग सुरू हाेण्यास उशीर झाला. स्टेडियम बंद होते, खेळाडूंसाठी उघडण्यात आले, मात्र पुन्हा बंद करण्यात आले. आता खेळाडू पॉझिटिव्ह आढळल्यानंतर स्पर्धा आयोजनावर शंका आहे. मेजर लीग सॉकर (एमएलएस) ८ जुलैपासून सुरू झाली आहे, तसेच एनबीए २२ जुलै, मेजर लीग बेसबॉल २४ जुलै व राष्ट्रीय हॉकी लीग १ ऑगस्टपासून सुरू होत आहे. या लीगच्या संघांनी सराव सुरू केला आहे.

लीग सुरू झाल्याने खेळाडूंवर तयारीचा दबाव एनएचएलमध्ये पाॅझिटिव्ह चाचणी दर ५.८ टक्के आहे. हा सामान्य जन संख्येच्या पॉझिटिव्ह चाचणी दरापेक्षा अधिक आहे. वांडरबिल्ट विद्यापीठाचे प्राध्यापक विलियम शेफनरने म्हटले की, ‘एनएचएलचे खेळाडू खूप ऊर्जावान आहेत. ते सामाजिक कार्यात सहभागी होत नाहीत. मात्र, सर्व दोष खेळाडूंना दिला जाऊ शकत नाही. लीग सुरू झाल्यानंतर त्यांच्यावर बाहेर पडून तयारी करण्याचा दबाव आहे. हा त्यांच्या कामाचा एक भाग असून त्यांना जिमला जावे लागते, व्यायाम व सराव करावा लागतो. स्पर्धेची तयारी करावी लागते.’ मेजर लीग सॉकर (एमएलएस) आणि एनबीए दोन्हींचे संघ फ्लोरिडाच्या डिज्नी वर्ल्ड स्पोर्ट्‌्स कॉम्प्लेक्समध्ये आहेत. त्याच ठिकाणी सामने खेळवले जातील.

खेळाडूंनी सावधगिरी बाळगण्याची गरज : तज्ज्ञ बिने यांनी म्हटले की, ‘कोरोना व्हायरस ५ दिवस ते २ आठवडे राहतो. अशात कमी काळात चाचणी घेऊन आम्ही त्याला पकडू शकत नाही. त्यासाठी लीग सुरू होण्यापूर्वी अनेक वेळा चाचण्या केल्या पाहिजे, कारण व्हायरस पसरू नये.’ संक्रमण रोगाचे तज्ज्ञ ब्रियाना फर्चने म्हटले की, ‘खेळाडूंना व्यायाम करताना सतत सावधगिरी बाळगावी लागेल. त्यांनी मास्क घातले पाहिजे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, शक्य तेवढे साफ-स्वच्छ राहायला हवे. तेव्हाच ते वाचू शकतील.’ ब्रियाना यांनी एनबीएच्या अनेक खेळाडूंना अनौपचारिक सल्ला दिला आहे. २४ ते ४८ तासात सलग चाचणी करावी लागेल. परिस्थिती येवढी गंभीर आहे की, खेळाडूंची सतत चाचणी करावी लागेल, असेही ते म्हणाले.

एनबीए : आठवड्यात २५ खेळाडू, १० कर्मचारी पॉझिटिव्ह

गत आठवड्यात राष्ट्रीय बास्केटबॉल असोसिएशनने (एनबीए) घोषणा केली की, २३ ते २९ जूनदरम्यान ३१५ खेळाडूंची चाचणी झाली, ज्यामध्ये २५ पॉझिटिव्ह आढळले. या आठवड्यादरम्यान ८८४ कर्मचाऱ्यांची चाचणी झाली, ज्यामध्ये १० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह मिळाला. मेजर लीग बेसबॉलने ३७४८ लोकांचे नमुने घेतले हेाते. यात ५८ खेळाडू आणि ८ कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले. एरिजोना आणि फ्लोरिडामध्ये सलग प्रकरणे पुढे आल्यानंतर लीगने सराव बंद केला. त्यासह वॉशिंग्टन नॅशनल्स, ह्यूस्टन एस्ट्रोस, सेंट लुईस कार्डिनल्स आणि सॅन फ्रान्सिस्को जाएंस्टसने सांघिक सराव रद्द केला. मात्र, एनबीएच्या चाचणीनुसार, खेळाडू व कर्मचारी, सदस्य यांच्यातील पॉझिटिव्ह चाचणीमध्ये दरात मोठे अंतर आहे.