आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • As There Was No Money For Treatment, It Was Time To Quit The Game; Now In The Indian Team With The Help Of A Coach

मंडे पॉझिटिव्‍ह:उपचारासाठी पैसे नव्हते म्हणून खेळ सोडण्याची वेळ आली होती ; प्रशिक्षकाच्‍या मदतीने आता भारतीय संघात

सुमय कर | रायपूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्तीसगडच्या १८ वर्षीय डी. कीर्ती हिने भारतीय बास्केटबाॅल संघात स्थान िमळवले आहे. राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी मात्र तिला १० वर्षे प्रतीक्षा करावी लागली. भिलाईच्या कीर्तीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला प्रशिक्षक रोहित पटेल आणि त्यांचे वडील राजेश पटेल यांनी अखंड परिश्रम घेतले. कीर्तीने २०१२ मध्ये उन्हाळी शिबिरापासून खेळण्यास सुरुवात केली. पहिल्या ६ महिन्यांतच कीर्तीचा खेळ पाहून तिच्या अंगभूत गुणांची जाणीव राजेश पटेल यांना उमगली होती परंतु सन २०१८ मध्ये राजेश यांचे निधन झाले. त्यानंतर कीर्तीनेही बास्केटबाॅल कोर्टवर जाणे कमी केले. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. त्याच दरम्यान कोरोनाचे संकट उद्भवले. तिलाही कोरोना झाला. उपचारासाठी तिच्याकडे पैसेही नव्हते. राजेश पटेेल यांचे पुत्र रोहित पटेल हे सुद्धा प्रशिक्षक होते. त्यांनाही कीर्तीही उत्कृष्ट खेळाडू असल्याचे माहिती होते. त्यांनीच तिला उपचारासाठी मदत केली. परंतु त्याचवेळी कीर्तीच्या वडिलांनी तिचे यापुढे खेळणे बंद करण्याचा निर्णय घेतला. अशा वेळी राेहित यांनी तिच्या वडिलांना समजावले आणि कीर्तीची पूर्ण जबाबदारी घेतली. तिच्या डाएटपासून ते अगदी प्रशिक्षणापर्यंतचा खर्च त्यांनीच केला.

कीर्तीचे वडील नगरपालिकेत सफाई कर्मचारी आहेत. कमाई बेताचीच असल्याने मुलीला खेळात करिअर करू द्यावे अशी त्यांची परिस्थिती नाही. अशावेळी सुरुवातीच्या दिवसांत प्रशिक्षकाने आपल्या घरी कीर्तीच्या राहण्याची व्यवस्था केली. तिला प्रशिक्षणही दिले. आता पाॅइंट गार्ड म्हणून कीर्तीचा संघात समावेश झाला आहे.

नुकत्याच इंदूर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत छत्तीसगड संघाने कांस्य पदक पटकावले. कीर्तीने ८ सामन्यात १८० स्कोअर केला. तिला बेस्ट स्कोअररचा पुरस्कार मिळाला. याच स्पर्धेतून कीर्तीची राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात निवड झाली होती. दोन महिन्यांच्या शिबिरानंतर १८ वर्षांखालील १२ सदस्यीय संघात तिची निवड झाली.

बातम्या आणखी आहेत...