आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Ashleigh Barty Defeated Pliskova To Win The Women's Singles Wimbledon Champion Title

विम्बल्डन:बार्टी पहिल्यांदा विम्बल्डन चॅम्पियन, प्लिस्काेवाचा पराभव; याेकाेविक आज किताबासाठी बेरेटिनीशी फायनलमध्ये झुंजणार

लंडनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नंबर वन नाेवाक याेकाेविकची नजर 19 व्या ग्रँडस्लॅम किताबावर

जगातील नंबर वन ॲश्ले बार्टी सत्रातील तिसऱ्या ग्रँडस्लॅम विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या किताबाची मानकरी ठरली. तिने शनिवारी एकेरीच्या फायनलमध्ये माजी नंबर वन कॅराेलिना प्लिस्काेवाचा १ तास ५६ मिनिटांत पराभव केला. तिने आक्रमक सर्व्हिस करताना ६-३, ६-७, ६-३ अशा फरकाने सामना अंितम सामना जिंकला. यासह तिने आपल्या करिअरमध्ये पहिल्यांदाच या जगातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित ग्रँडस्लॅम स्पर्धेत चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. तसेच २५ वर्षीय बार्टीच्या या जेतेपदामुळे तब्बल चार दशकांनंतर आॅस्ट्रेलियन टेनिसपटूला या स्पर्धेचा किताब आपल्या नावे करता आला आहे.

अव्वल मानांकित बार्टीची ही करिअरमधील दुसरी ग्रँडस्लॅम ट्राॅफी आहे. तिने यापूर्वी २०१९ मध्ये फ्रेंच आेपनचा किताब पटकावला हाेता. तसेच करिअरमध्ये बार्टीने आता सलग चाैथ्यांदा माजी नंबर वन प्लिस्काेवाचा पराभव केला. आतापर्यंत त्यांच्यात आठ सामने झाले. यातील चार सामन्यांत बार्टीने विजय संपादन केला.

१७.६ काेटींचे बक्षीस
जगातील नंबर वन बार्टीला पहिल्यांदाच व्हीनस राेझवाॅटर डिश (महिला एकेरी चॅम्पियनसाठीची ट्राॅफी) देऊन गाैरवण्यात आले. याशिवाय तिला याच साेहळ्यादरम्यान १७.६ काेटींच्या बक्षिसाचा धनादेश देण्यात आला. तसेच याप्रसंगी उपविजेत्या प्लिस्काेवाचाही गाैरव करण्यात आला.

नंबर वन नाेवाक याेकाेविकची नजर 19 व्या ग्रँडस्लॅम किताबावर
जगातील नंबर वन आणि अव्वल मानांकित नाेवाक याेकाेविक आपल्या करिअरमध्ये १९ वी ग्रँडस्लॅम ट्राॅफी जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. यासाठीच आज रविवारी ताे काेर्टवर उतरणार आहे. अव्वल मानांकित याेकाेविक आणि इटलीच्या बेरेटिनी यांच्यात रविवारी पुरुष एकेरीची फायनल हाेणार आहे. आतापर्यंत याेकाेविकने १८ वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन हाेण्याचा पराक्रम गाजवला आहे. आता हा किताब जिंकल्यानंतर त्याला सर्वाधिक ग्रँडस्लॅम ट्राॅफीच्या विक्रमात राॅजर फेडरर आणि राफेल नदालच्या विक्रमाची बराेबरी साधता येईल. नदाल आणि फेडररच्या नावे १९ वी ग्रँडस्लॅम ट्राॅफींची नाेंद आहे.

बातम्या आणखी आहेत...