आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताचे स्टार स्पिनर्स रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी क्रिकेटच्या मैदानावर अमेरिकन फलंदाजांना थक्क केले. त्याचवेळी अहमदाबाद कसोटी संपल्यानंतर क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहूनही दोघांनी लोकांना वेगळाच आनंद झाला. सोमवारी ऑस्कर पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर यात नाटू नाटू गाण्याला ओरिजिनल सॉंगचा पुरस्कार मिळाला. त्यामुळे नाटू नाटू गाण्यावर अश्विन-जडेजा हे दोघेही थिरकले. त्याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
सर्वांच्या ओठावर RRRचे नाटू नाटू सॉंग
सोमवारी पहाटे संपूर्ण देशाला ऑस्कर सोहळ्यातून दोन आनंदाच्या बातम्या मिळाल्या. नाटू नाटूला गाण्याला पुरस्कार मिळाल्यानंतर देशभरात आनंद साजरा केला जात होता. नाटू नाटू गाण्यावर सर्वत्र लोक थिरकत होते. सर्वांच्या ओठांवर या गाण्याचे बोल होते. दुसरीकडे या गाण्यावर क्रिकेट क्षेत्रातील मान्यवरांनी देखील थिरकण्याचा आनंद लुटत ऑस्करचा आनंदोत्सव साजरा केला. यात दीप दास गुप्ता, मॅथ्यू हेडन यांच्यासह अनेक समालोचक या गाण्यावर नाचताना दिसले. त्याचवेळी सामना संपल्यानंतर संयुक्तपणे प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून निवड झालेल्या रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांनीही या गाण्याच्या हुक स्टेपचे सादरीकरण करून सेलिब्रेशन केले.
अश्विनने जडेजासोबतचा व्हिडिओ केला व्हायरल
सामन्यानंतर अश्विनने जडेजासोबतचा एक व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रथम दोघेही अक्षय कुमारच्या चित्रपटातील डायलॉगवर अभिनय करताना दिसत आहेत. यानंतर, व्हिडिओच्या शेवटी नाटू-नाटू गाणे वाजते आणि दोघेही खांद्यावर हात ठेवून त्यांच्या हुक स्टेप करतात. त्याच्या कॅप्शनमध्ये अश्विनने ऑस्करचा उल्लेख केला आणि त्याच्या स्वत:च्या शैलीत गाण्याला ऑस्कर मिळाल्याचा आनंदही साजरा केला.
अनेक प्लेअर्सने साजरा केला आनंदोत्सव
अश्विन-जडेजा व्यतिरिक्त, सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि वीरेंद्र सेहवागसह अनेक माजी क्रिकेटपटूंनीही देशासाठी या यशाबद्दल अभिनंदन संदेश पोस्ट केले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.