आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Ashwin On Mankading Out In IPL 2020 Dinesh Karthik Ricky Ponting Jos Buttler Mankading Rules News Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएलपूर्वी मांकडिंगवर वादविवाह:बॉल फेकण्यापूर्वी फलंदाजाने क्रीज सोडल्यास फ्री बॉल मिळावा आणि आउट झाल्यावर संघाच्या 5 धावा कमी कराव्यात- अश्विन

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॉल टाकण्यापूर्वी नॉन स्ट्राइक एंडवरील फलंदाजाने क्रीज सोडल्यावर त्याला आउट करण्याला मांकडिंग म्हणतात

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)सुरू होण्यापूर्वी मांकडिंग रन आउटवर वादविवाद सुरू झाले आहेत. भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने म्हटले की, बॉल फेकण्यापूर्वी फलंदाजाने क्रीज सोडल्यास फ्री बॉल मिळावा आणि विकेट पडल्यावर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या पाच धावा कमी कराव्यात.

रन अपनंतर आणि बॉल टाकण्यापूर्वी नॉन स्ट्राइक एंडवरील फलंदाजाने क्रीज सोडल्यावर त्याला आउट करण्याला मांकडिंग म्हणतात. अश्विनने 25 मार्च 2019 ला राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरला अशा पद्धतीने आउट केले होते. परंतू, यानंतर अश्विनला खूप टीकेचा सामना करावा लागला होता.

आयसीसी आणि अनेक दिग्गजांनी नियम योग्य असल्याचे सांगितले: कार्तिक

नुकतच दिनेश कार्तिकने म्हटले की, ‘‘मांकड रन आउटबाबत माझे दोन प्रश्न आहेत. पहिला म्हणजे याला लागू करणे आणि दुसरा म्हणजे मांकड रन आउट म्हणण्याबाबत. सर डॉन ब्रॅडमनपासून सुनील गावस्करपर्यंत, अनेकांनी या नियमाला योग्य म्हटले आहे. आयसीसी आणि एमसीसी (मेरिलबोन क्रिकेट क्लब) नेदेखील याला योग्य म्हटले आहे. मग बॉलर किंवा बॉलिंग टीमला निगेटिव्ह का म्हटले जाते ? हे पहिल्यांदा जेव्हा झाले होते, तेव्हा वीनू मांकड यांनी फलंदाजाला अनेकवेळा वॉर्निंग दिली होती. परंतू, यात दुर्दैव म्हणजे, फलंदाजी करणाऱ्याला कोणी लक्षात ठेवत नाही, सर्वजण बॉलरला दोष देतात.’’

आता बॉलरला संधी मिळावी: अश्विन

अश्विनने कार्तिकच्या बोलण्यावर म्हटले की, ‘‘बॉलरला फ्री बॉल द्यावा. जर फलंदाज त्या बॉलवर आउट झाला, तर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या पाच धावा कमी कराव्यात. फ्री हिट फलंदाजासाठी फायद्याची ठरते, आता गोलंदाजालाही संधी मिळावी. अजूनही अनेकजण फलंदाजाकडून गोलंदाजाला मिळणाऱ्या फटक्यामुळेच सामना पाहतात.’’

अश्विनला मांकडिंगग करू देणार नाही: पॉंटिंग

दिल्ली कॅपिटल्सचे कोच रिकी पोंटिंगने काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, भारतीय स्पिनर रविचंद्रन अश्विनशी चर्चा करणार आणि त्याला मांकडिंग करण्यापासून रोखणार. हे योग्य नाही, खेळाच्या विरुद्ध आहे.

जो क्रीज पार करेल, त्याला मांकडिंग आउट करणार: अश्विन

​​​​​​​
30 डिसेंबरला एका चाहत्याने अश्विनला विचारले होते की, आयपीएल 2020 मध्ये कोणत्या फलंदाजाला मांकडिंगग रन आउट करणार ? यावर अश्विन म्हणाला होता की, जो क्रीज पार करेल, त्याला मांकडिंग आउट करणार.

वीनू मांकडं यांच्या नावावरुन पडले ‘मांकडिंग’ नाव

घटना 13 डिसेंबर 1947 ची आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान एक टेस्ट मॅच झाला होता. यात भारतीय वीनू मांकड यांनी ऑस्ट्रेलियाच्या विल ब्राउनला याप्रकारे आउट केले होते. या घटनेपासून अशाप्रकारे आउट करण्याला ‘मांकडिंग’म्हटले जाते. क्रिकेटमध्ये हा नियम लागू तर आहे, पण याबाबत दोन गट आहेत. काही जानकार आणि फलंदाज या नियमाच्या सोबत आहेत, तर काही विरोधात.