आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन:अश्विनी-सुमीत 50 मिनिटांत विजयासह मुख्य फेरीत दाखल

जकार्ताएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारताच्या अनुभवी बॅडमिंटनपटू अश्विनी पोनप्पाने सहकारी सुमीत रेड्डीसोबत इंडाेनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. भारताच्या जोडीने ५० मिनिटांमध्ये मिश्र दुहेरीच्या पात्रता फेरीतील सामन्यात जपानच्या निशिकोवा-ओजाकीला पराभूत केले.

भारताच्या अश्विनी-सुमीतने १७-२१, २१-१८, २१-१४ ने सामना जिंकला. यासह भारताची ही जोडी मुख्य फेरीसाठी पात्र ठरली आहे. दुसरीकडे आकर्षी कश्यपने मुख्य फेरी गाठली आहे. तिने पात्रता फेरीत थायलंडच्या सिराडाला पराभूत केले. तिने १३-२१, २१-९, २१-९ अशा फरकाने रोमहर्षक विजयाची नोंद केली. दरम्यान, भारताच्या शुभंकरला पात्रता फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याचे मुख्य फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले.

भारताच्या सायना नेहवालसह पी.कश्यप आणि एचएस प्रणयने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे भारताची मदार आता या युवा खेळाडूंवर आहे.

बातम्या आणखी आहेत...