आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Asia Cup 2022 IND Vs Pakistan Record Virat Kohli Equals Record With Fifty Against Mohammad Rizwan Pakistan, Big Records In Indo Pak Match: Kohli Becomes Highest 50+ Scorer In T20Is, Rohit Surpasses Jayasuriya In Sixes

भारत-पाक सामन्यात अनेक मोठे विक्रम:कोहली T-20 मध्ये सर्वाधिक 50+ धावा करणारा फलंदाज, रोहितचाही नवा विक्रम

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी झालेल्या सुपर-4 सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला असला तरीही या सामन्यात भारतीय खेळाडूंनी अनेक मोठे विक्रम केले. जाणून घ्या त्या रेकॉर्डबद्दल …

1. पाकिस्तानविरुद्ध पॉवर प्लेमध्ये भारताच्या सर्वाधिक धावा

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केएल राहुल आणि रोहित शर्मा यांच्यात पहिल्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी होती.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केएल राहुल आणि रोहित शर्मा यांच्यात पहिल्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी होती.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताची सलामी जोडी रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी चांगली सुरुवात केली. दोघांनी पहिल्याच षटकापासून पाकिस्तानी गोलंदाजाची धुलाई करण्यास सुरुवात केली आणि चौकार आणि षटकारांची जोरदार फटकेबाजी केली.

पॉवर प्लेमध्ये रोहित आणि राहुलची 54 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर राहुलला साथ देण्यासाठी कोहली आला आणि पुढच्या षटकात आठ धावा झाल्या. पॉवर प्लेमध्ये भारतीय संघाने विकेट गमावून 62 धावा केल्या होत्या.

T-20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध पॉवर प्ले दरम्यान भारताची ही आतापर्यंतची सर्वाधिक धावसंख्या आहे. यापूर्वीचा विक्रम 2012 मध्ये 6 षटकात 1 गडी गमावून 48 धावांचा होता.

2. पाकिस्तानविरुद्ध भारताचा दुसरा सर्वाधिक स्कोअर

विराट कोहलीच्या शानदार अर्धशतक च्या जोरावर रविवारी पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाने 7 गडी गमावून 181 धावा केल्या. टी-20 इंटरनॅशनल सामन्यांमध्ये भारताचा पाकिस्तानविरुद्धचा सर्वाधिक स्कोअर 192 धावांचा आहे आणि तो 2012 मध्ये काढल्या होत्या.

3. विराट बनला T-20 मध्ये सर्वाधिक फिफ्टी ठोकणारा खेळाडू

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली फॉर्ममध्ये परतला आहे. त्याने हाँगकाँग आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सलग दोन अर्धशतके झळकावली आहेत. यासह, त्याने इंटरनॅशनल T-20 मध्ये 32 वे अर्धशतक पूर्ण केले आणि 31 वेळा T-20 मध्ये सर्वाधिक अर्धशतक ठोकण्याचा रोहित शर्माचा विक्रमही मागे टाकला. टी-20 मध्ये विराट आणि रोहितनंतर बाबर आझमने 27 अर्धशतकं, डेव्हिड वॉर्नरनं 23 आणि मार्टिन गुप्टिलने 22 अर्धशतकं झळकावली आहेत.

4. कोहलीचा पाकिस्तानविरुद्धच्या T-20 मधील सर्वाधिक अर्धशतकांच्या क्लबमध्ये समावेश

विराटने पाकिस्तानविरुद्ध टी-20 क्रिकेटमधील चौथे अर्धशतक झळकावले. यासह तो भारताकडून पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी एरॉन फिंच, केन विल्यमसन, केविन पीटरसन आणि मार्टिन गुप्टिल यांनीही पाकिस्तानविरुद्ध टी-20मध्ये 4 अर्धशतके झळकावली आहेत.

5. पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावाही विराटच्या नावावर

या सामन्यात विराटने आणखी एक मोठा विक्रम स्वताच्या नावावर केला आहे तो म्हणजे पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम. त्याने 9 T-20 सामन्यामध्ये 406 धावा केल्या आहेत. तसेच कोणत्याही भारतीय फलंदाजाची त्याच्यापेक्षा चांगली सरासरीही नाही. पाकिस्तानविरुद्ध कोहलीची सरासरी 67.66 इतकी आहे.

दुबईच्या याच मैदानावरच कोहलीने गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकातही शानदार अर्धशतक झळकावले होते. मात्र, तो सामना टीम इंडियाने गमावला होता.

रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्ध 16 चेंडूत 28 धावा केल्या.
रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्ध 16 चेंडूत 28 धावा केल्या.

6. रोहित बनला T-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने रविवारी पाकिस्तानविरुद्ध 12 धावा पूर्ण केल्यानंतरच तो पुरुष आणि महिला या दोन्हींच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. रोहितने 16 चेंडूत 28 धावा केल्या. यासह त्याने 135 टी-20 सामन्यांमध्ये 3548 धावा केल्या आहेत.

रोहितपूर्वी हा विक्रम न्यूझीलंडची फलंदाज सुझी बेट्सच्या नावावर होता. सुजीने 3531 धावा केल्या आहेत. तर या यादीत रोहितनंतर मार्टिन गुप्टिल तिसऱ्या स्थानावर आहे, त्याने 121 सामन्यांमध्ये 31.79 च्या सरासरीने 3497 धावा केल्या आहेत. विराट कोहली 3462 धावांसह चौथ्या स्थानावर आहे.

7. षटकार ठोकण्यामध्ये रोहितने जयसूर्याला टाकले मागे

आशिया कपमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याला मागे टाकले आहे. रोहितने पाकिस्तानविरुद्धच्या 28 धावांच्या खेळीत 2 षटकार आणि 1 चौकार लगावला. यासह त्याने आशिया कपमध्ये आतापर्यंत 25 षटकार मारले आहेत.

तर आशिया कपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आफ्रिदीच्या नावावर आहे. त्याने 26 षटकार लगावले आहे. जयसूर्याने 23, रैनाने 17 आणि धोनीने 16 षटकार ठोकले आहेत.

8. रिझवान या हंगामात फलंदाजीत पोहोचला अव्वल स्थानी

मोहम्मद रिझवान आशिया चषकाच्या या हंगामात आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये तो अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या 3 सामन्यात 96 च्या सरासरीने 192 धावा केल्या आहेत. भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात रिझवानने 51 चेंडूत 71 धावा केल्या.

त्याचबरोबर विराट कोहली 3 सामन्यात 77 च्या सरासरीने 154 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने रविवारी पाकिस्तानविरुद्ध 60 धावा केल्या. अफगाणिस्तानचा रहमुल्ला गुरबाज 45 च्या सरासरीने 135 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

बातम्या आणखी आहेत...