आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशिया चषक:पाकने दिला UAE मध्ये आशिया कप आयोजित करण्यासाठी नवा प्रस्ताव; नाकारल्यास स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी

दुबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आशिया क्रिकेट परिषदेला (ACC) एक नवीन प्रस्ताव दिला आहे. पीसीबीकडून असे सांगण्यात आले आहे की, जर एसीसी सदस्य भारताने इतर देशांमध्ये सामने आयोजित करण्याचा प्रस्ताव स्वीकारत नसतील तर पाकिस्तान ​​​​यूएईमध्ये आशिया कप आयोजित करण्यास तयार आहे.

पीसीबीचे प्रमुख नजम सेठी यांनी मंगळवारी दुबईत एसीसी अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि आपले म्हणणे मांडले. आशिया चषक श्रीलंकेत आयोजित करण्याच्या प्रस्तावावरही त्यांनी आक्षेप घेतला. त्याचवेळी त्यांनी आपला नवा प्रस्ताव नाकारल्यास आशिया चषकातून माघार घेण्याची धमकीही त्यांनी दिली आहे. यंदा आशिया कपचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. आशिया चषक 2 ते 17 सप्टेंबर दरम्यान होणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सेठी यांनी मंगळवारी दुबईमध्ये एसीसी अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि आशिया कप यूएईमध्ये आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला. सेठी यांना विश्वास आहे की, एसीसी त्यांचा नवीन प्रस्ताव नाकारणार नाही. आपली बाजू मांडताना ते म्हणाले की, 2018 आणि 2022 मध्ये आशिया कप युएईमध्ये आयोजित करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत यावेळेसही ही स्पर्धा यूएईमध्ये आयोजित केली जाऊ शकते. सेठी यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) सप्टेंबरमध्ये UAE मधील जास्त उष्णतेबद्दलची चिंता फेटाळून लावली आणि सांगितले की, BCCI ने 2020 मध्ये सप्टेंबर आणि नोव्हेंबरमध्ये देखील​​​​​​ ​UAE मध्ये IPL सामने आयोजित केले आहेत.

श्रीलंकेने यजमानपदाची ऑफर दिल्याने सेठींना धक्का
श्रीलंकेच्या बोर्डाने बीसीसीआयच्या सहकार्याने मागच्या दरवाजाने आशिया चषक आयोजित करण्याची ऑफर दिल्याने सेठी आश्चर्यचकित झाले आहेत. फेब्रुवारीमध्ये झालेल्या एसीसीच्या शेवटच्या बैठकीत बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने यावर्षी आशिया चषक आयोजित करण्याचा श्रीलंकेचा प्रस्ताव फेटाळला होता. पाकिस्तान यजमानपद कायम ठेवणार यावर गेल्या बैठकीत एकमत झाले होते.

पीसीबी अधिकाऱ्यांना वेगळ्या स्पर्धेसाठी सांगितली सूचना
दुबईला जाण्यापूर्वी सेठी यांनी पीसीबीच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सांगितले होते की, जर आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडून काढून घेण्यात आले तर पाकिस्तान आशिया चषकावर बहिष्कार टाकेल.अशा परिस्थितीत त्यावेळच्या रिकाम्या चौकटीत तीन-चार देशांच्या स्पर्धा आयोजित करण्याचे काम सुरू करा.

ACC सदस्य देशांनी नाकारले होते हायब्रीड मॉडेल
यापूर्वी असे वृत्त आले होते की, ACC सदस्य देशांनी पाकिस्तानच्या हायब्रीड मॉडेलचा म्हणजेच भारताचे सामने पाकिस्तानबाहेर हलवण्याचा प्रस्ताव नाकारला होता. त्याचबरोबर सदस्य देशांना आशिया चषक पाकिस्तानमधून बाहेर काढायचा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बांगलादेश आणि श्रीलंकेने यावेळी आशिया कप आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला होता. श्रीलंकेचा दावा मजबूत मानला जात होता. मात्र, ACC कडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

आता जाणून घ्या, काय आहे वादाचे कारण
आयसीसी कॅलेंडरमध्ये 2023 मध्ये होणारा आशिया कप पाकिस्तानला देण्यात आला होता. कॅलेंडर प्रसिद्ध होताच भारतीय संघ पाकिस्तानात खेळण्यासाठी जाणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. बीसीसीआयने आशिया चषक तटस्थ ठिकाणी आयोजित करण्याची मागणी केली होती, परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ते मान्य केले नाही. कारण आशिया ​​​​​ चषक केवळ आपली ढासळलेली आर्थिक स्थिती सुधारेल अशी अपेक्षा करत आहे. मात्र, पाकिस्तानने ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर आयोजित करण्याचा प्रस्तावही ठेवला होता. त्यानुसार भारताचे सामने बाहेर हलवले जातील. या स्पर्धेतील उर्वरित सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत. भारत फायनलमध्ये पोहोचला तर फायनलही पाकिस्तानच्या बाहेर असेल.

पीसीबी वर्ल्डकप न खेळण्याची दिली धमकी
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही वर्ल्डकप न खेळण्याची धमकी दिली आहे. एकदिवसीय विश्वचषक या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारतात होणार आहे. भारत आशिया चषक खेळायला आला नाही तर भारतात खेळायलाही जाणार नाही, अशी धमकीही पीसीबी देत आहे. तसेच, पाकिस्तानने आयसीसीला त्यांचे सामने विश्वचषकातून बाहेर काढण्याची विनंती केली आहे.

आशिया कपमध्ये ७ देश सहभागी होणार आहेत
आशिया कपमध्ये भारत, पाकिस्तान, नेपाळ, अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ सहभागी होणार आहेत. भारत, पाकिस्तान, नेपाळ हे एकाच गटात आहेत. नेपाळ प्रथमच यासाठी पात्र ठरला आहे. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका दुसऱ्या गटात आहेत.