आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अायपीएलसाठी आशिया कप रद्द केला जाऊ शकत नाही, असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष एहसान मनी यांनी म्हटले. पाकिस्तानच्या यजमानपदात आशिया कप सप्टेंबरमध्ये यूएईत खेळवण्यात येणार आहे. आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहेे. बीसीसीआय आशिया कप रद्द झाल्यावर सप्टेंबर किंवा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आयपीएलचे आयोजन करू इच्छितो. एहसान मनी म्हणाले की, “ मी या सर्व गोष्टींबाबत ऐकले-वाचले आहे. मात्र, आयपीएलला स्थान देण्यासाठी आशिया कप रद्द केला जाऊ शकत नाही. हा केवळ भारत-पाकिस्तानचा मुद्दा नाही. त्यासोबत इतरही देश जोडले आहेत. आशिया कप खूप आवश्यक आहे, आशियाई क्रिकेटचा विकास यातून मिळणाऱ्या िनधीवर अवलंबून आहे.’ पहिले आशिया कप पाकिस्तानमध्ये होणार होता. मात्र, त्यानंतर दुबई व अबुधाबीमध्ये खेळवण्याचे ठरले. त्यांनी म्हटले की, “या स्पर्धेचे आयोजन सप्टेंबरमध्ये परिस्थिती कशी असेल त्यावर अवलंबून आहे. यातून मिळणारा निधी पुढील दोन वर्षांसाठी आशिया क्रिकेट समितीच्या सदस्य देशामधील खेळाच्या विकासासाठी गरजेचा आहे.’
पाकला आयसीसीकडून ६० कोटी मिळणार होते
एहसान मनी म्हणाले की, “जर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक झाला नाही तर अनेक देशांवर आर्थिक संकट येऊ शकते. कारण, आयसीसी सदस्य देशांना स्पर्धेतून त्यांच्या हिश्श्याचा निधी देणार नाही.’ त्यांच्या मते, पाकिस्तानला आयसीसीकडून जून व जानेवारीमध्ये ७ ते ८ मिलियन डॉलर (जवळपास ५४ ते ६० कोटी रुपये) मिळणार होते. एहसान मनी म्हणाले, “पाकिस्तानने २०२३ आणि २०३१ दरम्यान होणाऱ्या आयसीसीच्या अनेक स्पर्धांच्या आयोजनाची इच्छा व्यक्त केली आहे. यात आयसीसी यूथ कप आणि विश्वचषकाचा समावेश आहे.’ त्यांनी म्हटले, आयसीसीच्या गेल्या स्पर्धेचे आयोजन बिग थ्री भारत, ऑस्ट्रेलिया व इंग्लंडने आपापसात वाटून घेतले होते. यंदा अनेक देश अायोजनासाठी इच्छुक असतील, अशी अाशा आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.