आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Asia Cup | Koch Dravid's Participation Confirmed Today, Immediately Leave For Dubai If Report Comes Negative

आशिया कप:काेच द्रविडच्या सहभागावर आज शिक्कामाेर्तब, रिपाेर्ट निगेटिव्ह आल्यास लगेच दुबईला रवाना

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या शनिवारपासून यूएईमध्ये टी-२० फाॅरमॅटच्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेला सुरुवात हाेणार आहे. या स्पर्धेसाठी सात वेळचा किताब विजेता भारतीय संघ मंगळवारी दुबईत दाखल झाला आहे. मात्र, काेराेनाची लागण झाल्यामुळे प्रशिक्षक राहुल द्रविडला जाता आले नाही. आता त्याच्या आशिया कपमध्ये भारतीय संघसाेबतच्या सहभागाबाबत गुरुवारी शिक्कामाेर्तब हाेणार आहे. त्याची आज पुन्हा एकदा काेविड चाचणी केली जाईल. यातील वैद्यकीय अहवालानंतरच याेग्य ताे निर्णय घेण्यात येईल. हा रिपाेर्ट निगेटिव्ह आल्यास द्रविड तत्काळ दुबईकडे रवाना हाेणार आहे. यादरम्यान एनसीएचे डायरेक्टर व्हीव्हीएस लक्ष्मणला स्टँडबायच्या भूमिकेत सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे द्रविडच्या अहवालावर सर्व काही अवलंबून आहे. भारतीय संघाचा पहिला सामना रविवारी पाकिस्तान टीमविरुद्ध रंगणार आहे.

बातम्या आणखी आहेत...