आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागीर सोमनाथ (गुजरात) येथे नुकत्याच झालेल्या शुबोकोई शितोरियो राष्ट्रीय कराटे स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत १९ पदके आपल्या खात्यात जमा केली. यात ७ सुवर्ण, ७ रौप्य व ५ कांस्यपदकांचा समावेश आहे. विजेत्या खेळाडूंमध्ये औरंगाबादच्या खेळाडूंनी महत्त्वाचा वाटा उचलला. विजेत्या खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक आर्यन पाटील, प्रियंका सरनाईक, शुभम भोजने यांचे मार्गदर्शन लाभत आले.
विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे : सुवर्णपदक - यश वाघमारे, विशाखा तिरचे, साईअंश जोहरले, आयुष त्रिभुवन, प्रसन्ना मोटे, श्वेता सौदागर, स्वराज राठोड. रौप्यपदक - तन्मय जावळे, साईराज तायडे, आम्रपाली नवगिरे, लखन डांगर, व्यंकटेश पेंढारकर, कोमल सरनाईक, ए. जावळे. कांस्यपदक - सायली गायकवाड, यश गणकांवर, अमन पठाण, आशुतोष खरात, आदित्य चव्हाण.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.