आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Audience Allowed In India England Test, But Not In Final Of The Test Championship

भारत-इंग्लंड कसोटीत प्रेक्षकांना प्रवेश:कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यादरम्यान चाहत्यांवर प्रवेशबंदी कायम

लंडन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयपीएलमध्ये खेळलेल्या खेळाडूंना संधी नाही

इंग्लंडच्या सरकारने देशातील चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेशाची परवानगी दिली. २१ जूनपासून त्याची अंमलबजावणी होईल. त्यामुळे इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाची (ईसीबी) चिंता कमी झाली आहे. जवळपास एक वर्षाने इंग्लंडमध्ये क्रिकेट चाहते स्टेडियममध्ये बसून सामना पाहू शकतील. इंग्लंड व श्रीलंका यांच्यात २१ जूनपासून मर्यादित षटकांची मालिका खेळवली जाईल, त्यात चाहत्यांना प्रवेश मिळेल. इंग्लंड व भारत यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यानही चाहते स्टेडियममध्ये येऊ शकतील. मात्र, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील १८ जूनपासून साउथम्प्टनमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यादरम्यान चाहत्यांना प्रवेश बंदी असेल.

आयपीएलमध्ये खेळलेल्या खेळाडूंना संधी नाही
ईसीबीच्या खेळाडूंना विश्रांती देण्याच्या योजनेंतर्गत आयपीएलमध्ये खेळलेले त्यांच्या देशाचे खेळाडू न्यूझीलंड विरुद्ध खेळणार नाहीत. इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यात २ कसोटी सामन्यांची मालिका २ जूनला सुरू हाेत आहे. माहितीनुसार, बटलर, बेअरस्टो, वोक्स, करेन, मोइन अली सारख्या खेळाडूंची या मालिकेसाठी निवड केली जाणार नाही. इंग्लंडला जून ते सप्टेंबरदरम्यान ७ कसोटी सामने आणि १२ मर्यादित षटकांचे सामने खेळायचे आहेत. त्यानंतर टी-२० विश्वचषक आणि अॅशेज देखील. अशात तणाव व्यवस्थापन अंतर्गत या प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली जाईल. कारण, महत्त्वाच्या मालिकेसाठी ते तयार राहतील.

बातम्या आणखी आहेत...