आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:संकुलावरील अॅथलेटिक्स सिंथेटिक ट्रॅकची फाइल दाेन वर्षांपासून मंत्रालयात धूळ खात; धावपटूंचे माेठे नुकसान

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: एकनाथ पाठक
  • कॉपी लिंक
  • अॅथलेटिक सिंथेटिक ट्रॅकसाठीचे सात काेटी सात लाख खात्यावर पडून; कामाला सुरुवात हाेईना
  • प्रशासनाच्या दिरंगाईचा ठरताेय माेठा अडसर; रखडले सिंथेटिक ट्रॅकचे काम

औरंगाबाद गुणवंत धावपटू मातीवर जीवताेड मेहनत करून आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धेतील सिंथ‌ेटिक ट्रॅकवर सुवर्णपदकाचा पल्ला गाठत आहेत. मात्र, प्रत्यक्षात सात कोटी सात लाख रुपयांच्या मंजुरी मिळालेल्या विभागीय क्रीडा संकुलातील अॅथलेटिक्स सिंथेटिक ट्रॅकचे काम अद्यापही सुरू होईना. या कामाच्या प्रत्यक्ष मंजुरीची फाइल मागील दोन वर्षांपासून मंत्रालयामध्ये पडून आहे. त्यामुळे येथील गुणवंत धावपटूंचे माेठे नुकसान होत आहे. मात्र, या कामाकडे प्रशासनानेच थेट पाठ फिरवली आहे.

दोन वर्षांपूर्वीच सिंथेटिक ट्रॅकला मंजुरी :
औरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलावरील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अॅथलेटिक्स सिंथेटिक ट्रॅकच्या प्रस्तावाला २०१८ मध्ये मंजुरी देण्यात आली. यासाठी खास सात कोटी सात लाखांचा निधीही मंजूर करण्यात आला. यासाठी विभागाच्या वतीने निविदा मागवण्यात आल्या होत्या. यामध्ये सुरुवातीला अनेक कंत्राटदारांनी पाठ फिरवली होती. मात्र, अखेर कर्नाटकच्या एका कंपनीने याबाबत पुढाकार घेतला आणि निविदाही भरली. स्थानिक पातळीवरच्या मंजुरीनंतर प्रत्यक्षात कामाच्या मंजुरीसाठी ही फाइल मंत्रालयात पाठवण्यात आली. मात्र, यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही.

नव्या कंपनीमुळे फाइल अडकली : सिंथेटिक ट्रॅकचे काम करण्यासाठी एका नव्या कंत्राटदार कंपनीने निविदा भरली आहे. यातील सर्व पात्रताही या कंपनीने पूर्ण केल्या. मात्र, आता या कंपनीच्या आडकाठीसाठी प्रत्यक्षात कामाच्या मंजुरीलाच रोखण्यात आल्याची चर्चा आहे. यातून काम रखडले आहे. या कंपनीने कामासाठी उत्सुक असल्याचे सांगितले.

तांत्रिक अडचणीमुळे फाइल मंत्रालयात
विभागीय संकुलावरील अॅथलेटिक सिंथेटिक ट्रॅक कामाची फाइल सध्या मंत्रालयात आहे. यामध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली अाहे, अशी प्रतिक्रिया उपसंचालक ऊर्मिला मोराळे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...