आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुष-महिला 58 वी राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा:औरंगाबादची जळगाववर मात ; औरंगाबादचे संघ विजयी

हिंगाेलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद, औरंगाबाद व सोलापूर या संघांनी विजय मिळवत रविवारी पुरुष-महिला ५८ वी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. रामलीला मैदानावर सकाळच्या सत्रात महिला गटातील सांगली विरुध्द नाशिक हा सामना वगळता अन्य बहुतांश सामने एकतर्फी झाले. मुंबईने लातूरचा ११-६ असा एक डाव ५ गुणांनी, ठाण्याने धुळ्याचा १ डाव ८ गुणांनी (१५-७) असा विजय मिळवला. अन्य सामन्यात महिला गटात औरंगाबादने सिंधुदुर्गचा ४ गुणांनी (११-७) असा पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. औरंगाबादचा जळगाववर डावानी विजय : पुरुष गटात औरंगाबादने जळगावचा १४-१२ असा १ डाव २ गुणांनी पराभव केला. औरंगाबादतर्फे अस्मित गावित (२ मि. संरक्षण), आकांक्षा खोजे (२.१० मि. संरक्षण व २ गुण) यांनी तर जळगावतर्फे स्वप्निल चौधरीने (२.१० मि. संरक्षण) चमकदार कामगिरी केली. नंदुरबारने लातूरचा, ठाण्याने सिंधुदुर्गचा, अहमदनगरने नंदुरबारचा, पालघरने नांदेडचा पराभव केला.

बातम्या आणखी आहेत...