आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Aurangabad District Atyapatya Team Selection Test Competition | Marathi News

निवड चाचणी:औरंगाबाद जिल्हा आट्यापाट्या संघ निवड चाचणी स्पर्धेत सहभागासाठी आवाहन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळ व हौशी आट्यापाट्या असोसिएशन शेगावच्या वतीने १८ ते २० मे २०२२ या कालावधीत शेगाव जिल्हा बुलढाणा येथे 35 वी पुरुष व 31वी महिला सिनिअर आट्यापाट्या राज्यस्तरीय स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत औरंगाबाद जिल्हा पुरुष व महिला दोन्ही संघ सहभागी होणार आहे, सदरील स्पर्धा करीता जिल्हा स्तरीय निवड चाचणी स्पर्धा १५ मे रविवार रोजी सायंकाळी ४.०० वा लाल मैदान साई भावसिंगपुरा मैदानावर होईल. औरंगाबाद जिल्हाचा अंतिम संघाची घोषणा लगेच सायंकाळी ०६.३० वाजता मैदानावर करण्यात येईल,इच्छूक खेळाडूंनी आपले आधारकार्ड व ३ पासपोर्ट फोटोसह मैदानावर उपस्थित राहावे.या निवड चाचणी स्पर्धांमध्ये आधिकाधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवावे असे आवाहन संघटनेचे सुनिल डावकर,धर्मेंद्र काळे, सतिश इंगळे, रमेश प्रधान,दिलीप जाधव, अनिल मोटे,आदींनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...