आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादची नवदुर्गा:सायकलपटू सोनम शर्मा यांनी एकाच वर्षात दोनदा पटकावला सुपर रॅन्डोनिअर्सचा किताब

क्रीडा प्रतिनिधी /औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवरात्र विशेष: जागर कर्तुत्वाचा

नवरात्रीच्या महोत्सवातून तमाम महिला शक्तीला कर्तृत्वाची शिकवून देण्यासाठी औरंगाबादची सायकलपटू सोनम शर्माने अशी कामगिरी करून दाखवली आहे. औरंगाबादची ही गुणवंत सायकलपटू एका वर्षांमध्ये दोनदा सुपर रॅन्डोनिअर्सचा किताब विजेती ठरली. अशा प्रकारची कामगिरी करणारी ही मराठवाड्याची एकमेव सायकलपटू ठरली आहे.

ब्रेवेट्स डे रॅन्डनेर मॉंडियाक्स (बीआरएम) निश्चित अंतराच्या राईड्स आहेत, ज्या ऑडॅक्स क्लब पॅरिसियन (एसीपी) द्वारे शासित केलेल्या विशिष्ट वेळेच्या मर्यादेत पूर्ण केल्या पाहिजेत. सर्व ब्रेवेट्स एसीपी च्या नियम आणि नियमांनुसार आयोजित केले जातात. सोनम शर्मांनी एका वर्षात दोनदा सुपर रॅन्डोनिअर्सचा किताब पटकाविला. ही स्पर्धा ऑक्टोबर ते ऑक्टोबर 2020/21 आयोजित होती.

सुपर रॅन्डोनिअर्स ही स्पर्धा एका वर्षात 200 किमी, 300 किमी, 400 किमी, 600 किमी अंतराची मालिका असते तर सोनम शर्मा यांनी ही स्पर्धा एका वर्षात दोनदा करणारी मराठवाड्यातील पहिली महिला सायकलपटू ठरली आहे. बीआरएम शारीरिक आणि मानसिक सहनशक्ती कस काढणारी स्पर्धा आहे. अजिबात सोपे नसले तरी, हे विविध क्षमता असलेल्या लोकांच्या त्यांच्या क्षमतेची व्यक्तीक हळू हळू वाढवून देते. या अपूर्व कामगिरी बद्दल सोनमचे औरंगाबाद जिल्हा सायकल संघटनेचे अध्यक्ष निखिल कचेश्वर सचिव चरणजीत सिंग संघा, अतुल जोशी, अमोघ जैन, मनिष खंडेलवाल, हरिश्चंद्र म्हात्रे, कविता जाधव,डॉ प्रेरणा देवकर, परिनीता खैरनार यांनी शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...