आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:औरंगाबादमध्ये शुक्रवारपासून राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा रंगणार

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व औरंगाबाद जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व औरंगाबाद चेस अकादमीतर्फे ९ वर्षांखालील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे १७ ते २० जूनदरम्यान औरंगाबादेतील कलश मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत मुलींचा व ओपन गटात स्पर्धा होईल. स्पर्धेसाठी १०५ खेळाडूंनी प्रवेश निश्चित केला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ स्पर्धेचे सहसचिव हेमेंद्र पटेल व आयोजक अमरीश जोशी यांनी दिली.

स्पर्धेत दररोज २ फेऱ्या खेळवल्या जातील, तर एकूण ८ फेऱ्या होतील. विजेत्यांना एकूण २० हजारांची बक्षिसे ठेवली आहे. या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्य संघाची निवड केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...