आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालस न घेतल्यामुळे आपल्याला एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत न खेळताच मायदेशी सर्बियाला परत यावे लागेल, अशी कल्पनाही जगातील क्रमांक एकचा खेळाडू नोवाक योकोविकने कधी केली नसावी. १७ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेल्या योकोविकचा व्हिसा रद्द करण्यात आला असून त्याला परत पाठवण्याची तयारी आहे. तथापि, त्याने या निर्णयाविरुद्ध स्थानिक न्यायालयात धाव घेतली आहे. २० ग्रँड स्लॅम जिंकलेल्या योकोविकला बुधवारी मध्यरात्री मेलबर्नला पोहोचल्यानंतर विमानतळावरच रोखण्यात आले. ऑस्ट्रेलियन बॉर्डर फोर्सनुसार, वैद्यकीय सवलतीबाबतची कागदपत्रे दाखवू न शकल्याने त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला. याप्रकरणी राजनयिक वाद सुरू झाला आहे.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन गुरुवारी पत्रकार परिषदेत म्हणाले,‘कुठलाही देश नियमांपेक्षा मोठा नाही.’ तिकडे, सर्बियाचे राष्ट्रपती अलेक्झांडर वुसिस यांनी हे प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करू, असे म्हटले आहे. त्याआधी बुधवारी टेनिस ऑस्ट्रेलियाने म्हटले होते की, योकोविकला लसीविना खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे, त्याने वैद्यकीय आधारावर विशेष सवलत मागितली होती. व्हिक्टोरिया प्रांत सरकारनेही मंजुरी दिली होती. या विशेष सवलतीवरून देशभर गदारोळ झाला. सूत्रांनुसार, ‘आपल्याला कोरोना झालेला आहे, त्यामुळे शरीरात अँटिबॉडीज आहेत, त्यामुळे आपल्याला व्हॅक्सिनेटेड मानले जावे,’ असा युक्तिवाद योकोविकने केला होता. टेनिस ऑस्ट्रेलियाने तथ्य तपासण्यासाठी आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहिले होते.
मंत्रालयाने म्हटले होते की,‘एखाद्याने दोन्ही डोस घेतले नसतील तर त्याला देशात व्हॅक्सिनेटेड मानण्यात येणार नाही.’ या आधारावर योकोविकचा युक्तिवाद फेटाळण्यात आला. तसाही योकोविक लसीला विरोध करत आला आहे. सध्या योकोविक मेलबर्नच्या ‘द पार्क’ हॉटेलमध्ये आहे. व्हिसा नियम तोडणाऱ्यांना तेथेच ताब्यात ठेवले जाते. सोमवारी या प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत योकोविक या हॉटेलमध्येच राहील.
लॅकोस्टेच्या प्रायोजकत्वाद्वारेच दरवर्षी ६७ कोटींची कमाई, खासगी विमानही
फोर्ब्जनुसार, जगातील सर्वाधिक कमाई असलेल्या खेळाडूंत योकोविकचा समावेश आहे. त्याची नेटवर्थ सुमारे १६३५ कोटी रुपये आहे. तथापि, २०२१ च्या यादीत तो चौथ्या स्थानी होता. त्याच्या लक्झरी संपत्तीचा पोर्टफोलिओ माँटे कार्लोपासून मियामी, मॅनहटन, मार्बेला व बेलग्रेडपर्यंत पसरला आहे. त्याचे अनेक रेस्तराँही आहेत. लॅकोस्टेच्या प्रायोजकत्वाद्वारेच त्याला दरवर्षी ६७ कोटी रुपये मिळतात. टेनिस रॅकेट निर्मात्या अॅसिक्ससारख्या कंपन्यांशीही त्याचा करार आहे. योकोविककडे खासगी विमानही आहे. २०१४ मध्ये त्याने जेलेना रेस्टिकशी विवाह केला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.