आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुखापतीने त्रस्त असलेल्या माजी नंबर वन नाेवाक जाेकाेविचने २ तास ६ मिनिटे शर्थीची झंुज देत ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत राेमहर्षक विजय साजरा केला. त्याने पुरुष एकेरीच्या चाैथ्या फेरीमध्ये यजमान ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनाॅरचा पराभव केला. सर्बियाच्या जाेकाेविचने ६-२, ६-१, ६-२ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याला अंतिम आठमधील प्रवेश निश्चित करता आला. दुखापतीमुळे पट्टी बांधून ताे काेर्टवर विजयासाठी झुंजताना दिला. त्यामुळे त्याचा हा विजय लक्षवेधी ठरला. याच दुखापतीमुळे त्याला गत सामन्यादरम्यान मेडिकल ब्रेक घ्यावा लागला हाेता. मात्र, आता त्याने काेणत्याही प्रकारचा ब्रेक न घेता खेळी कायम ठेवली. यातून त्याला तीन सेटवर विजय साजरा करता आला. आता त्याचा अंतिम आठमधील सामना आंद्रे रुबलेवशी हाेणार आहे. पाचव्या मानांकित रुबलेवने पाच सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात नवव्या मानांकित हाेल्गरचा पराभव केला. त्याने ६-३, ३-६, ६-३, ४-६, ७-६ ने सामना जिंकला. आता त्याला जाेकाेविचच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.
गार्सियाविरुद्ध लिनेटचा सनसनाटी विजय; सानिया-बाेपन्ना उपांत्यपूर्व फेरीत पाेलंडच्या बिगर मानांकित मेग्डा लिनेटने महिला एकेरीच्या चाैथ्या फेरीत सनसनाटी विजयाची नाेंद केली. तिने लढतीत चाैथ्या मानांकित कॅराेलिन गार्सियाला ७-६, ६-४ नेे पराभूत केले. तिने वयाच्या ३० व्या वर्षी पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचा पल्ला गाठला आहे. आता तिच्यासमाेर लढतीत प्लिसकाेवाचे तगडे आव्हान असणार आहे. प्लिसकाेवाने सामन्यात स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेनकिचचा पराभव केला. तिने ७-५, ६-२ ने सामना जिंकला.भारताच्या सानिया मिर्झा व राेहन बाेपन्नाने मिश्र दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली.
मुख्य प्रशिक्षकाने दिल्या पेपरवर जाेकाेला टिप्स स्पर्धेत सर्बियाच्या नाेवाक जाेकाेविचला दुसऱ्या फेरीच्या सामन्यादरम्यान मुख्य प्रशिक्षकांनी पेपरवर काही महत्वाच्या टिप्स लिहून दिल्या हाेत्या. मात्र, आता हाच प्रकार टीकेच्या ताेडी आहे. यादरम्यान एटीपी टूरचे सुपरवायझर यांनीही या प्रकार चुकीचे असल्याचे म्हटले आहे. नियमाचे उल्लंघन झाल्याने आता जाेकाेविचवर कारवाई हाेण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप त्याने या प्रकरणावर काेणत्याही प्रकारची प्रतिक्रीया दिली नाही. त्याच्या कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.