आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Australian Open Naomi Osaka Second Champion; Fourth Grandslam Book In Career

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑस्ट्रेलियन ओपन:नाओमी ओसाका दुसऱ्यांदा चॅम्पियन; करिअरमध्ये चाैथा ग्रँडस्लॅम किताब

मेलबर्न9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जपानच्या नाओमी ओसाकाने सत्रातील पहिल्या ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. तिने या स्पर्धेत शनिवारी महिला एकेरीचे विजेतेपद मिळवले. हा तिचा करिअरमधील दुसरा ऑस्ट्रेलियन ओपन किताब ठरला. याशिवाय तिने आपल्या करिअरमध्ये एकूण चौथा ग्रँडस्लॅम किताब आपल्या नाावे केला आहे.

तिसऱ्या मानांकित ओसाकाने महिला एकेरीच्या फायनलमध्ये अमेरिकेच्या जेनिफर ब्रँडीला ६-४, ६-३ ने पराभूत केले. ब्रँडी प्रथमच ग्रँडस्लॅमचा अंतिम सामना खेळत होती. कठोर क्वॉरंटाइनमध्ये राहिल्यानंतरदेखील सरस खेळीच्या बळावर ती अंतिम फेरीत दाखल झाली. मात्र, तिचा यादरम्यान किताबाचा मार्ग अधिक खडतर मानला जात हाेता. ब्रँडीला यूएस ओपनच्या उपांत्य फेरीतदेखील आेसाकाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. पहिल्या सेटमध्ये ब्रँडीने ओसाकाला चांगली टक्कर दिली. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये जपानी खेळाडू एकवेळ ४-० ने पुढे होती. ब्रँडीने पुनरागमनचा खूप प्रयत्न केला, मात्र तिला यश आले नाही. ओसाकाचा सलग २१ वा आणि ग्रँडस्लॅममध्ये सलग १४ विजय ठरला. तिने २०२० यूएस ओपन किताब जिंकला होता. २३ वर्षीय नाआेमी ओसाका चौथ्यांदा ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचली आणि प्रत्येक वेळी विजेतेपद मिळवले. ती मोनिका सेलेसनंतर सलग पहिले ग्रँडस्लॅम फायनल जिंकणारी पहिला महिला खेळाडू बनली. सेलेसने १९९० ते १९९१ दरम्यान अशी कामगिरी केली होती. पुरुष गटात केवळ रॉजर फेडरर अशी कामगिरी करू शकला.

बातम्या आणखी आहेत...