आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेत्या साेमवारपासून सत्रातील पहिल्या ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेला सुरुवात हाेणार आहे. ही स्पर्धा सुरू हाेण्याच्या तीन दिवसांपूर्वी जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविकला माेठा धक्का देेणारी घटना घडली. ऑस्ट्रेलियातील इमिग्रेशन मिनिस्टर अॅलेक्स हाॅक यांनी जनहिताचा हवाला देत थेट याेकाेविकचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. विवेकाधिकाराचा वापर करत हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यामुळे आता याेकाेविकचा स्पर्धेतील सहभाग अडचणीत सापडला आहे. तसेच त्याला आता थेट तीन वर्षांपर्यंत आॅस्ट्रेलियात प्रवेश मिळणार नाही. या कारवाईमुळे सर्बियाचा टेनिसपटू याेकाेविकने पुन्हा न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे.
लसीकरणाशिवाय ताे ऑस्ट्रेलियन आेपन टेनिस स्पर्धेत सहभागी हाेणार हाेता. यासाठी त्याला स्पर्धा आयाेजकांच्या स्वतंत्र पॅनलने अधिकृत अशी परवानगीही दिली हाेती. मात्र, काेराेना महामारीचा धाेका वेगाने वाढत असताना याेकाेविकने लसीकरण केलेले नाही. यासह ताे ऑस्ट्रेलियात दाखल झाला. याच कारणावरून त्याचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय गत आठवड्यात झाला हाेता. याच प्रकरणामुळे त्याने थेट स्थानिक न्यायालयात धाव घेतली. त्याने यादरम्यान स्थानिक प्रशासनाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेडरल काेर्टात दाखल केली हाेती. यावर गत साेमवारी सुनावणी झाली. यात न्यायालयाने याेकाेविकला दिलासा देणारा निर्वाळा केला. तत्काळ व्हिसा रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा, अशा प्रकारच्या सूचनाही न्यायालयाने स्थानिक प्रशासनाला दिल्या. त्याला आगामी तीन वर्षांपर्यंत आॅस्ट्रेलियात प्रवेश नाकारला जाण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे आता त्याला ऑस्ट्रेलियातून बाहेर पडावे लागणार आहे. यातून २० वेळच्या ग्रँडस्लॅम चॅम्पियन याेकाेविक आता यंदाच्या ऑस्ट्रेलियन आेपन टेनिस स्पर्धेला मुकण्याचे चित्र आहे.
पब्लिक इंटरेस्ट नसल्याचे सिद्ध केल्यास याेकाेविकला मिळेल न्याय
ऑस्ट्रेलियन नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने याेकाेविकचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता यात पब्लिक इंटरेस्ट नव्हता हे याेकाेविकला सिद्ध करावे लागेल. याच्याच आधारे याेकाेविक पुन्हा एकदा न्यायालयीन लढाई जिंकू शकताे, अशा शब्दांत सिडनी विद्यापीठातील विधी विभागातील प्राध्यापक मॅरी क्राॅक यांनी आपले मत मांडले. कारण याेकाेविकचा अपीलमधील विजय हा फार आव्हानात्मक आहे. यात त्याला अपयशाला सामाेरे जावे लागेल, असेही त्यांनी सांगितले. याेकाेविकला स्थानिक सरकारच्या नियमाचे पालन करायचे नाही व देशही साेडायचा नाही. यासाठी त्याने न्यायालयात निषेधाज्ञासाठीचा अर्ज करावा. यातून त्याला ऑस्ट्रेलियातून बाहेर पडावे लागणार नाही. तसेच त्याला स्पर्धेतही सहभागी हाेता येईल, असे मत मर्डाेक विद्यापीठातील विधी विभागाच्या प्राध्यापिका मॅरी एने यांनी मांडले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.