आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Australian Open Novak Djokovic Won The Tournament For The Third Year In A Row

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑस्ट्रेलियन ओपन:याेकाेने सलग तिसऱ्या वर्षी स्पर्धा जिंकली, फायनलमध्ये रशियाच्या मेदवेदेववर 7-5, 6-2, 6-2 ने मात

मेलबर्न3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वाधिक ग्रँडस्लॅम चॅम्पियनमध्ये नदाल-फेडररपाठाेपाठ दुसऱ्या स्थानी याेकाेविक

जगातील नंबर वन टेनिसपटू नाेवाक याेकाेविक यंदाच्या सत्रातील आॅस्ट्रेलियन आेपनमध्ये चॅम्पियन ठरला. त्याने रविवारी पुरुष एकेरीचा किताब पटकावला. यासाठी त्याने एकेरीच्या फायनलमध्ये रशियाच्या डॅनियल मेदवेदेवला पराभूत केले. अव्वल मानांकित याेकाेविकने एक तास ५३ मिनिटे रंगलेली फायनल ७-५, ६-२, ६-२ अशा फरकाने जिंकली. यासह ताे सत्रातील पहिल्या ग्रँडस्लॅम किताबाचा मानकरी ठरला. त्याने आपल्या करिअरमध्ये नवव्यांदा या स्पर्धेत चॅम्पियन हाेण्याचा पराक्रम गाजवला. आता नववी फायनल जिंकून याेकाेविक हा किंग आॅफ मेलबर्न ठरला आहे. ३३ वर्षीय याेकाेविकने सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले हाेते. ताे याठिकाणी २०११ ते २०१३ पर्यंत चॅम्पियन राहिला हाेता.

तसेच त्याने आपल्या करिअरमधील १८ वा ग्रँडस्लॅम किताब जिंकला. सर्वाधिक ग्रँडस्लॅम चॅम्पियनच्या यादीत याेकाेविक हा दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीमध्ये माजी नंबर वन व नदाल आणि राॅजर फेडरर हे प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम ट्राॅफीसह संयुक्तपणे अव्वल स्थानी आहेत. त्यापाठाेपाठ याेकाेविक दुसऱ्या स्थानी आहे.

मेदवेदेव दुसऱ्यांदा उपविजेता :
मेदवेदेव दुसऱ्यांदा ग्रँडस्लॅम फायनलममध्ये पराभूत झाला. त्याला याेकाेविकने पराभूत केले. यापूर्वी, स्पेनच्या राफेल नदालने २०१९ च्या अमेरिकन आेपन फायनलमध्ये मेदवेदेवला धूळ चारली हाेती.

आठ मार्चपर्यंत नंबर वन
सर्बियाच्या नाेवाक याेकाेविकने आता किताबासह आपले जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान कायम ठेवले. ताे आता ८ मार्चपर्यंत क्रमवारीत अव्वलस्थानी कायम राहणार आहे. यातून ताे अव्वलस्थानावर राहून ३११ आठवडे पूर्ण करणाार आहे. आतापर्यंत स्वीसकिंग राॅजर फेडररच्या नावे ३१० आठवडे अव्वल स्थानावर राहण्याचा विक्रम नाेंद हाेता.

‘ नंबर वन याेकाेविक हा माझ्यासाठी देवासारखाच आहे. माेनाकाे स्पर्धेदरम्यान मी क्रमवारीत ५०० वा ६०० व्या स्थानावर असताना याेकाेविकसाेबत टेनिसचा सराव केला हाेता. त्याचा मनमाेकळा स्वभाव आहे. त्यामुळे मनातील दडपण दूर झाले हाेते. त्याच्यामुळे मला सातत्याने प्रेरणा मिळत गेली. त्याच्याकडून मला नेहमी पाठबळ मिळत गेले आहे. त्याची शैली ही नेहमी प्रेरणा देते. - डॅनियल मेदवेदेव, पराभवानंतर.