आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियन ओपन:रायबकिना पहिल्यांदाच उपांत्य फेरीमध्ये

मेलबर्न4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विम्बल्डन चॅम्पियन एलिना रायबकिनाने विजयी माेहीम कायम ठेवताना सत्रातील पहिल्या ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. यासह तिने स्पर्धेतील किताबाचा आपला दावा मजबूत केला. फाॅर्मात असलेल्या २३ वर्षीय रायबकिनाने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये १७ व्या मानांकित येलेना ओेस्तापेंकाेचा पराभव केला. तिने ६-२, ६-४ ने सामना जिंकला. यासह तिने करिअरमध्ये पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा पल्ला गाठला. आता तिचा उपांत्य फेरीचा सामना २४ व्या मानांकित व्हिक्टाेरिया अझारेंकाशी हाेणार आहे. अझारेंकाने उपांत्यपूर्व फेरीत तिसऱ्या मानांकित जेसिका पेगुलाचा ६-४, ६-१ ने पराभव केला. यातून तिला अंतिम चारमधील प्रवेश निश्चित करता आला. फ्रेंच ओपनच्या उपविजेत्या स्टिफानाेस सितसिपासने एकेरीतील विजयी माेहिम कायम ठेवताना अंतिम चारमध्ये प्रवेश केला. त्याने पुुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये गणराज्यच्या जिरी लेहेकाचा पराभव केला. त्याने ६-३, ७-६, ६-४ ने सामना जिंकला.

बातम्या आणखी आहेत...