आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ऑस्ट्रेलियाला मालिका विजयाची संधी; विंडीज संघ अडचणीत

अॅडिलेड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यजमान ऑस्ट्रेलिया संघ आता आपल्या घरच्या मैदानावर विंडीजविरुद्ध मालिका विजय साजरा करण्यासाठी उत्सुक आहे. यापासून यजमान संघ अवघ्या सहा पावलांवर आहे. ऑस्ट्रेलिया संघाला विजयासाठी ६ विकेटची गरज आहे. यजमान ऑस्ट्रेलिया संघाने ३१ षटकांत ६ बाद १९९ धावांवर आपला दुसरा डाव घाेषित केला. यासह ऑस्ट्रेलिया संघाने आता विंडीजसमाेर विजयासाठी ४९७ धावांचे टार्गेट ठेवले. प्रत्युत्तरात निराशाजनक सुरुवात झालेल्या विंडीज संघाने दिवसअखेर दुसऱ्या डावात ४ बाद ३८ धावा काढल्या आहेत. यजमान ऑस्ट्रेलिया संघाकडून स्काॅट बेलंडने सर्वाधिक ३ आणि मिशेल स्टार्कने १ विकेट घेतली. सलामीवीर कर्णधार ब्रेथवेट ३ धावांवर बाद झाला. ब्रुक व ब्लॅकवूड शून्यावर बाद हाेत आल्यापावली पॅव्हेलियनमध्ये परतले. आता डेव्हाेन थाॅमस (८) आणि जेसन हाेल्डर (८) मैदानावर कायम आहेत. अद्याप ४५९ धावांनी पिछाडीवर असलेल्या विंडीजकडे सहा विकेट शिल्लक आहेत. त्यामुळे आता विंडीज संघाला सावध खेळी करावी लागणार आहे. सुमार फलंदाजीमुळे विंडीजचा दमदार सुरुवात करण्याचा प्रयत्न अपुरा ठरला.

बातम्या आणखी आहेत...