आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक स्तरावरील क्रीडाविश्वात आता ऑस्ट्रेलिया नव्याने सुपर पॉवर म्हणून नावलाैकिक मिळवत आहे. ऑस्ट्रेलियाने क्रिकेटपाठाेपाठ आता हाॅकी, स्विमिंग, टेनिस, अॅथलेटिक्स, रग्बी खेळ प्रकारात आपला दबदबा निर्माण केला आहे. क्रिकेटमध्ये अाॅस्ट्रेलियन महिला संघ विक्रमी सात आणि पुुरुष संघ विक्रमी ५ वेळा विश्वविजेता ठरलेला आहे. महिला व पुरुष संघांनी टी-२० वर्ल्डकपही जिंकलेला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये जवळपास १६६ ग्रँडस्लॅम चॅम्पियन टेनिसपटू आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाने ऑलिम्पिकमध्येही सर्वाधिक पदके जिंकणाऱ्या टाॅप-१० मध्ये स्थान निश्चित केलेले आहे. ऑस्ट्रेलियाने ऑलिम्पिकच्या जलतरण इव्हेंटमध्ये सर्वाधिक ७० सुवर्णपदकांची कमाई केलेली आहे. क्रीडाविश्वात अधिक बलाढ्य होण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये खास योजना राबवली जात आहे.
बाहेरील खेळाडूंचे मोठे पाठबळ
ऑस्ट्रेलियामध्ये मूळ वंशीयांपेक्षा बाहेरून वास्तव्यास आलेल्या खेळाडूंची संख्या मोठी आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला क्रीडाविश्वात मोठी प्रगती साधता येत आहे. या ठिकाणी २०० देशांतील नागरिक वास्तव्यास आलेले आहेत. त्यामुळे गुणवंत व चॅम्पियन खेळाडू मिळाले. यातून ऑस्ट्रेलियाला प्रत्येक खेळ प्रकारात पदकविजेते खेळाडू मिळत आहेत. या गुणवत्तेला चालना मिळत आहे.
आर्थिक तरतूद मोठी
ऑस्ट्रेलियाने क्रीडाविश्वातील आपला नावलाैकिक वाढवण्यासाठी आर्थिक बजेट वाढवण्यावर भर दिला. यातून इव्हेंटनुसार या बजेटची तरतूद करण्यात आलेली आहे. न्यू साऊथ वेल्स राज्याने २०२०-२१ मध्ये आगामी चार वर्षांसाठी जवळपास ३४६० कोटींची आर्थिक तरतूद केली आहे. व्हिक्टोरिया राज्याने २२९० कोटींची तरतूद केलेली आहे. या मानाने भारताचे यासाठीचे बजेट फारच कमी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.