आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Australia's Wicketkeeper Alyssa Hilli Broke Dhoni's Record In T20 Cricket, Taking 92 Wickets Behind The Wicket

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धोनीचा विक्रम मोडला:ऑस्ट्रेलियाची विकेटकीपर एलिसा हिलीने टी-20 क्रिकेटमध्ये मोडला महेंद्रसिंह धोनीचा 'हा' विक्रम

बिस्ब्रेन7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलियाची विकेटकीपर एलिसा हिलीने टी-20 मॅचमध्ये धोनीचा विक्रम मोडला आहे. हिलीने विकेटच्या मागून 92 फलंदाजांना आउट केले. यात 42 कॅच आणि 50 स्टंपिंग आहेत. आता ती पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये विकेट्सच्या मागून सर्वात जास्त फलंदाजांना आउट करणारी विकेटकीपर बनली आहे. हिलीने दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये न्यूजीलँडची फलंदाज एलन बॉर्डरला स्टंप आउट करुन या नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. तीन टी-20 मॅचची सीरीज ऑस्ट्रेलियाने 2-0 ने जिंकली.

हीलीने आतापर्यंत 114 टी-20 मॅचमध्ये 92 फलंदाजांना आउट केले आहे. तर, धोनीने 98 मॅचमध्ये 91 फलंदाजांना विकेटमागून आउट केले. यात 57 कॅच आणि 34 स्टंपिंग आहेत. धोनीनंतर इंग्लँडची सारा टेलर आहे. तिने 90 मॅचमध्ये 74 फलंदाजांना आउट केले. यात 23 कॅच आणि 51 स्टम्पिंग आहेत.

हिलीने गोलंदाजांना दिले श्रेय

हिलीने याबाबत म्हटले की, यात दुमत नाही की, हा मोठा विक्रम आहे. पण, यात माझ्यापेक्षा जास्त श्रेय माझ्या संघाच्या गोलंदाजांचे आहे. यातून दिसते की, माझ्या करिअरमध्ये मला खूप चांगले गोलंदाज मिळाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...