आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफाॅर्मात असलेल्या गाेलंदाज मिशेल स्टार्क, मायकेल नेसेर आणि स्काॅट बाेलंडने (प्रत्येकी ३ बळी) सर्वाेत्तम खेळीतून घरच्या मैदानावर यजमान ऑस्ट्रेलियाचा मालिका विजय साजरा केला. यासह ऑस्ट्रेलिया संघाने गत तीन दशकांपासून विंडीजविरुद्ध सुरू असलेली विजयाची माेहीम कायम ठेवली. ऑस्ट्रेलिया संघाने रविवारी दुसऱ्या कसाेटी सामन्यात विंडीजला ४१९ धावांनी पराभूत केले. ऑस्ट्रेलिया संघाने १९९९ पासून आजतागायत विंडीजविरुद्ध पराभव पत्करला नाही. यासह ऑस्ट्रेलिया संघाने घरच्या मैदानावर आयाेजित दाेन कसाेटी सामन्यांची मालिका २-० ने आपल्या नावे केली. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ४९७ धावांच्या खडतर लक्ष्यचा पाठलाग करताना विंडीज संघाला ४०.५ षटकांत अवघ्या ७७ धावांवर आपला गाशा गुंडाळावा लागला. ऑस्ट्रेलिया संघाने कसाेटीत विजय साजरा केला. विंडीज संघाचे सात फलंदाज १९९ चेंडूंमध्ये ५५ धावांची कमाई करून पॅव्हेलियनमध्ये परतले. दरम्यान ऑस्ट्रेलिया संघाकडून स्टार्क, नेसेर आणि बाेलंडने प्रत्येकी तीन बळी घेत दणदणीत विजय साजरा केला. मालिकेत सर्वाधिक ५०२ धावा काढणारा मार्नस लबुशेन मालिकावीर आणि ट्रेव्हिस हेड सामनावीरचा मानकरी ठरला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.