आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्राचा ऑलिम्पियन लांब पल्ल्याचा धावपटू अविनाश साबळे मोरक्कोतील प्रेस्टिजियस डायमंड लीगमध्ये चमकला. त्याने या लीगमध्ये ३ हजार मीटर स्टिपलचेस प्रकारात पाचव्या स्थानी धडक मारली. त्याने ८:१२.४८ सेकंदांत निश्चित अंतर पार केले. यासह ताे पाचव्या स्थानावर राहिला. यादरम्यान त्याने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या बेजांमिन किगेनला मागे टाकले. आपल्याच नावे असलेला राष्ट्रीय विक्रम आठव्यांदा ब्रेक करण्याचा पराक्रम गाजवला. त्याने गत मार्च महिन्यात तिरुअंनतपुरम येथील इंडियन ग्रँडप्रिक्समध्ये तीन हजार स्टिपलचेस प्रकारात विक्रम केला हाेता. त्याने यादरम्यान हे अंतर ८:१६.२१ सेकंदांत गाठले हाेते. मात्र, त्याने आता आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावत पुन्हा एकदा नव्या विक्रमाची नोंद नावे केली.
टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन साैफियाने एल बक्कालीने आपल्या घरच्या मैदानावर चॅम्पियन हाेण्याचा पराक्रम गाजवला. त्याने हे अंतर ७:५८.२९ सेकंदांत गाठत अव्वल स्थानी धडक मारली.
प्रचंड मेहनत; कामगिरीत प्रगती :
बीडच्या २७ वर्षीय अविनाश साबळे आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी हाेत आहे. यातून त्याला आपल्या राष्ट्रीय विक्रमात प्रगती साधता येत आहे. त्याने २०१८ मध्ये ३ हजार मीटर स्टिपलचेसमध्ये ८:२९.८० सेकंदांसह राष्ट्रीय विक्रम केला हाेता. त्यानंतर प्रचंड मेहनतीतून कामगिरीत प्रगती साधत नव्या विक्रमी वेळेची नोंद आपल्या नावे केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.