आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आझाद चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा:टीम इलेव्हनने आझाद कॅम्पस संघाला हरवले

छत्रपती संभाजीनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लकी क्रिकेट क्लबतर्फे आयोजित आझाद चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत टीम इलेव्हनने आझाद कॅम्पस संघावर ३ गडी राखून मात केली. नवल टाटा स्टेडियमवर झालेल्या लढतीत इरफान पठाण सामनावीर ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आझाद संघाने २० षटकांत ७ बाद १३१ धावा उभारल्या. सलामीवीर उस्मान बिन हमोद १५ चेंडूंत १ चौकार व १ षटकार लगावत १३ धावा केल्या.

कर्णधार अरेझ खानला ४ धावांवर असताना रिझवान अहमदने आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. मो. अमनने १८, मो. अमीनने १५ धावा केल्या. आसिफ खान १८ धावांवर नाबाद राहिला. इलेव्हन संघाच्या रिझवान अहमद व बी. अहमद यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले.

इरफान पठाणचे अर्धशतक प्रत्युत्तरात १५.४ षटकांत ७ गडी गमावत १३४ धावा करत विजय साकारला. यात कर्णधार बी. अहमदने १० धावा केल्या. इरफान पठाणचे शतक अवघ्या ८ धावांनी हुकले. त्याने ४५ चेंडूंचा सामना करताना ११ चौकार व ६ षटकार खेचत ९२ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याला अरेझ खानने हर्ष दुबेच्या हाती झेलबाद केले. सय्यद फैझान कादरीने नाबाद १४ धावांची विजयी खेळी केली. आझादकडून असिफ खान व अरेझ खानने प्रत्येकी दोन दाेन गडी टिपले.

बातम्या आणखी आहेत...