आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Badminton: Lakshya Sen In The Semifinals; Srikanth, And Pranay Lose The Game|Marathi News

जर्मन ओपन स्पर्धा:बॅडमिंटन : लक्ष्य सेन उपांत्य फेरीत; श्रीकांत, प्रणयचा पराभूत

बर्लिन7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताचा २० वर्षीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने आता विजयी मोहीम अबाधित ठेवत सुपर ३०० स्पर्धेच्या विजेतेपदाच्या आशा पल्लवित केल्या. त्याने शुक्रवारी जर्मन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली. त्याने एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये आपल्याच देशाच्या एचएस प्रणयला ३९ मिनिटांत पराभूत केले. त्याने २१-१५, २१-१६ अशा फरकाने दाेन गेममध्ये विजय साकारला. आता त्याला नंबर वन अॅलेक्सनच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे त्याची या सामन्यातील विजयाची वाट अधिक खडतर मानली जात आहे. कारण, या सामन्यात अॅलेक्सनच्या विजयाचे पारडे जड आहे. याशिवाय त्याला स्पर्धेत एकेरीच्या किताबाचा प्रबळ दावेदार मानले जाते. मात्र, यातही सनसनाटी विजयाची नोंद करण्याची क्षमता लक्ष्य सेनमध्ये आहे.

डेन्मार्कचा ऑलिम्पिक चॅम्पियन व्हिक्टर अॅलेक्सनने एकेरीच्या लढतीत भारताच्या आठव्या मानांकित श्रीकांतला पराभूत केले. त्याने २१-१०, २३-२१ अशा फरकाने एकतर्फी विजय संपादन केला. यामुळे श्रीकांतचे अवघ्या ३५ मिनिटांत आव्हान संपुष्टात आले.

आता भारताचा एकमेव लक्ष्य सेन हा स्पर्धेत आपले आव्हान कायम ठेवून आहे. गुरुवारी सिंधूपाठाेपाठ सायना नेहवालला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. आता श्रीकांत आणि प्रणयचे आव्हान संपुष्टात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...