आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहासंघ आता थाॅमस कप जिंकण्याच्या ऐतिसहासिक यशानंतर आता देशभरामध्ये बॅडमिंटनपटूंच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी खास प्रयाेग साकारणार आहे. यासाठी भारतीय बॅडमिंटन महासंघाने (बाई) युवांच्या प्रशिक्षण अकादमीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता देशभरात बॅडमिंटनच्या प्रशिक्षण देणाऱ्या अकादमी सुरू करण्यात येणार आहे. यात तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांचाही आता देशभरात शाेध सुरू आहे. प्रायाेगिक तत्त्वावर यासाठी ३० प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी माजी खेळाडू आणि एनआयएस काेचच्या नियुक्तीवर अधिक भर दिला जाणार आहे, अशी माहितीही बाईने दिली. त्यामुळे आगामी वर्षभरात देशभरात बॅडमिंटनच्या प्रशिक्षण देणाऱ्या अकादमी सुरू हाेणार आहेत.
खेळाडूंच्या गुणवत्तेसाठी मास्टरप्लॅन :
बॅडमिंटन खेळ प्रकारामध्ये अनेक गुणवंत युवा खेळाडू आहेत. त्यामुळे यांना याेग्य प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज आहे. यासाठी महासंघाने खास मास्टर प्लॅन तयार केला. एनआयएस काेच आणि माजी खेळाडूंच्या मार्गदर्शनात या खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाईल. याच्या आधारे खेळाडूंना आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावण्याची संधी आहे. याच निश्चित असा माेठा फायदा महासंघाला मिळणार आहे. सातत्याने प्रशिक्षण व सराव शिबिराचे आयाेजन करण्यावर अधिक भर दिला जाणार आहे, अशी माहिती महासंघाचे सचिव संजय मिश्रा यांनी दिली.
नवीन प्रशिक्षक काेणत्याही सेंटरवर देणार प्रशिक्षण
महासंघाच्या वतीने आता प्रशिक्षकांच्या नियुक्ती करण्यात येणार आहेत. या नवनियुक्त प्रशिक्षकांना काेणत्याही सेंटरवर प्रशिक्षण देण्याची मुभा आहे. या निवडीदरम्यान राज्य संघटनेचाही महत्त्वाचा सहभाग राहणार आहे. यादरम्यान प्रशिक्षकांना माेठ्या मानधनावर नियुक्ती दिली जाणार आहे. या प्रशिक्षकांची राज्य संघटनेच्या वतीने संबंधित अकादमीमध्ये सर्व व्यवस्था केली जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.