आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Comanweath Game 2022 | Sakhmi Malik | Bajrang Punia, Deepak, Sakshi Malik Win Gold Hat trick In Wrestling Riots

राष्ट्रकुल स्पर्धा:कुस्‍तीच्‍या दंगलीत सुवर्ण हॅटट्रिक, बजरंग पुनिया, दीपक, साक्षी मलिक यांची सुवर्ण कामगिरी

बर्मिंगहॅम6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारताने कुस्तीत तीन सुवर्ण, एक रौप्य आणि एका कांस्यसह पाच पदके जिंकली. बजरंग पुनिया, दीपक पुनिया आणि साक्षी मलिकला सुवर्ण, अंशू मलिकला रौप्य आणि दिव्या काकरानला कांस्य मिळाले. ६२ किलो फ्रीस्टाइलमध्ये साक्षीने प्रथमच सुवर्ण पटकावले. पदकांच्या यादीत भारत ७ व्या स्थानावरून ५ व्या स्थानी पोहोचला. भारताने आतापर्यंत ९ सुवर्ण, ८ रौप्य, ८ कांस्यपदके जिंकली आहेत. पॅरा टेबल टेनिसमध्ये भाविना आणि लॉन बॉल्समध्ये पुरुष संघ फायनलमध्ये पोहोचला आहे.

आज भारताचे प्रमुख इव्हेंट
बॅडमिंटन सिंगल्स: क्वार्टर फायनलमध्ये पी.व्ही. सिंधू व किदांबी श्रीकांतचे सामने. बॉक्सिंग: सेमीफायनल
निखत जरीन, नीतू, अमिता, सागर, जस्मिनचे सामने.
महिला क्रिकेट: सेमी फायनल भारत इंग्लंड, 3.30 वा.
पुुरुष हॉकी : सेमी फायनल
भारत द. आफ्रिका, रात्री 10.30 पासून

भारताची एकूण पदके
सुवर्ण रौप्य कांस्य
9 8 8

बजरंग; 65 किलो गटात 9-2 गुणांनी विजयी दीपकने पाकिस्तानच्या इनामला 3-0 ने हरवले

बातम्या आणखी आहेत...