आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Bajrang Punia (Olympics Wrestling) LIVE Match Update; Tokyo News | Bajrang Punia Vs Kyrgyzstan Ernazar Akmataliev 65kg Freestyle; News And Live Updates

टोकियो ऑलिम्पिक:भारतीय मल्ल बजरंग पुनिया पदकापासून एक पाऊल दूर; उपांत्यपूर्व फेरीत इराणी खेळाडूला केले होते पराभूत, आज होणार सेमीफायनल

टोकियो2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बजरंगने जबरदस्त पुनरागमन केले

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पैलवान बजरंग पुनिया याने उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकला आहे. पुनिया याने 65 किलो वजनी गटात आशियाई चॅम्पियनशिपचे कांस्यपदक विजेता इराणच्या मोर्तेझा घियासीचा पराभव केला आहे. त्यामुळे भारतीय पैलवान बजरंग पुनिया आपल्या पदकापासून केवळ एक पाऊल दूर आहे.

सेमीफायनलमध्ये त्यांचा सामना अझरबैजानच्या हाजी अलीयेवशी होणार आहे. विशेष म्हणजे हा सामना आजच खेळला जाणार आहे. अलीयेव रिओ ऑलिम्पिकमधील 57 किलो वजनी कांस्यपदक तर 61 किलो वजनी गटात 3 वेळा विश्वविजेता आहे.

बजरंगने जबरदस्त पुनरागमन केले
दरम्यान, उपांत्यपूर्व सामन्याच्या फेरीत बजरंग 1-0 ने पिछाडीवर होता. त्यानंतर बजरंगला शेवटच्या मिनिटात 2 गुण मिळाले. पुनिया याने इराणी कुस्तीपटूचा पराभव करत सामन्यातून बाहेर केले. बजरंगला 'व्हिक्ट्री बाय फॉल रूल'द्वारे विजयी घोषित करण्यात आले.

भारताला आतापर्यंत 5 पदक
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत 5 पदक पटकावले आहे. पहिले पदक वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू यांनी जिंकले. पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटन आणि बॉक्सिंगमध्ये लवलीना बोरगोहेन यांनी पदक मिळवले. यासह भारतीय पुरष हॉकी संघाने एक तर कुस्तीत रवि दहियाने कांस्यपदक मिळवले आहे. 2012 नंतर भारताचा सर्वात यशस्वी ऑलिम्पिक राहिले आहे.

बातम्या आणखी आहेत...