आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताने केली लंडन ऑलिम्पिकशी बरोबरी:बजरंगने कझाकिस्तानच्या पैलवानाला 8-0 ने हरवून जिंकले कांस्य पदक, भारताचे सहावे मेडल

टोकियोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वडील म्हणाले होते - बजरंग कांस्य आणेल

भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहावे पदक जिंकले आहे. भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने फ्रीस्टाईल कुस्तीच्या 65 किलो गटात कझाकिस्तानच्या दौलत नियाजबेकोवचा 8-0 असा पराभव केला. यासह भारताने सर्वात यशस्वी 2012 लंडन ऑलिम्पिकच्या पदकाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

वडील म्हणाले होते - बजरंग कांस्य आणेल
उपांत्यपूर्व फेरीत शानदार सुरुवात केल्यानंतर बजरंगने उपांत्य फेरीचा सामना गमावला होता. बजरंगच्या वडिलांनी सांगितले होते की मुलगा कधीही रिकाम्या हाताने परतला नाही, तो नक्कीच कांस्य आणेल. संपूर्ण देशाच्या प्रार्थना त्याच्या पाठीशी आहेत. महिनाभरापूर्वी त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती, तरीही त्याने उपांत्य फेरी गाठली. बजरंगने आपल्या वडिलांचे शब्द खरे असल्याचे सिद्ध केले आहे.

सुरुवातीला आघाडी नंतर पिछाडी
कुस्तीपटू बंजरग पुनियाचा उपांत्य फेरीत अझरबैजानच्या हाजी अलीयेवकडून 12-5 ने पराभूत व्हावे लागले. दरम्यान, सुरुवातीच्या सामन्यात बजरंगने आघाडी घेतली. मात्र ती आघाडी कायम टिकवता आली नसल्याने अलीयेवने त्यांचा पराभव केला. हाजी अलीयेव अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी झाला असल्यामुळे बजरंगला रिपेचेजद्वारे कांस्यपदकासाठी लढण्याची संधी मिळत आहे.

उपांत्यपूर्व फेरीत इराणच्या मोर्तेझा घियासीचा केला होता पराभव
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पैलवान बजरंग पुनिया याने उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकला आहे. पुनिया याने 65 किलो वजनी गटात आशियाई चॅम्पियनशिपचे कांस्यपदक विजेता इराणच्या मोर्तेझा घियासीचा पराभव केला आहे.

बातम्या आणखी आहेत...