आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Bajrang Punia; Tokyo Olympics Wrestling LIVE Updates | Bajrang Punia Bronze Medal Latest News And Live Updates

कांस्यपदकासाठी बजरंगची पैज:वडील म्हणाले - आजपर्यंत रिकाम्या हाताने परतला नाही मुलगा, तो कांस्यपदक नक्कीच घेऊन येईल

टोकियोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारताला आतापर्यंत 5 पदक

भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया याला टोकियो ऑलिम्पिकमधील उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला. यामुळे पुनिया याचे टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकाचे स्वन भंगले आहे. परंतु, आज पुन्हा एकदा तो नव्या उमेदीने कांस्यपदकासाठी फ्रीस्टाईल कुस्तीच्या 65 किजो वजनी गटात खेळणार आहे. त्यांचा सामना आज दुपारी 3 वाजता सुरु होईल.

याच पार्श्वभूमीवर बजरंग पुनिया याचे वडील सांगतात की, माझा मुलगा आजपर्यंत कधीही रिकाम्या हाताने परतला नाही. त्यामुळे तो आज कांस्यपदक नक्कीच घेऊन येईल. संपूर्ण देशाची प्रार्थना त्यांच्या पाठीशी आहे. महिनाभरापूर्वी त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती, तरीही त्याने सेमीफायनलपर्यंत मजल मारली. दुखापतीमुळे त्याला काऊंटर अॅटक करता न आल्याचे त्यांच्या वडीलाने सांगितले.

सुरुवातीला आघाडी नंतर पिछाडी
कुस्तीपटू बंजरग पुनियाचा उपांत्य फेरीत अझरबैजानच्या हाजी अलीयेवकडून 12-5 ने पराभूत व्हावे लागले. दरम्यान, सुरुवातीच्या सामन्यात बजरंगने आघाडी घेतली. मात्र ती आघाडी कायम टिकवता आली नसल्याने अलीयेवने त्यांचा पराभव केला. हाजी अलीयेव अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी झाला असल्यामुळे बजरंगला रिपेचेजद्वारे कांस्यपदकासाठी लढण्याची संधी मिळत आहे.

उपांत्यपूर्व फेरीत इराणच्या मोर्तेझा घियासीचा केला होता पराभव
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पैलवान बजरंग पुनिया याने उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकला आहे. पुनिया याने 65 किलो वजनी गटात आशियाई चॅम्पियनशिपचे कांस्यपदक विजेता इराणच्या मोर्तेझा घियासीचा पराभव केला आहे.

बजरंगने जबरदस्त पुनरागमन केले
दरम्यान, उपांत्यपूर्व सामन्याच्या फेरीत बजरंग 1-0 ने पिछाडीवर होता. त्यानंतर बजरंगला शेवटच्या मिनिटात 2 गुण मिळाले. पुनिया याने इराणी कुस्तीपटूचा पराभव करत सामन्यातून बाहेर केले. बजरंगला 'व्हिक्ट्री बाय फॉल रूल'द्वारे विजयी घोषित करण्यात आले.

भारताला आतापर्यंत 5 पदक
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत 5 पदक पटकावले आहे. पहिले पदक वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू यांनी जिंकले. पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटन आणि बॉक्सिंगमध्ये लवलीना बोरगोहेन यांनी पदक मिळवले. यासह भारतीय पुरष हॉकी संघाने एक तर कुस्तीत रवि दहियाने कांस्यपदक मिळवले आहे. 2012 नंतर भारताचा सर्वात यशस्वी ऑलिम्पिक राहिले आहे.

बातम्या आणखी आहेत...