आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Bangladesh's 103 Against The West Indies; Six Batsmen Were Dismissed For Zero

बांगलादेश संघाची दाणादाण उडाली:विंडीजविरुद्ध बांगलादेशचा 103 धावांत खुर्दा; सहा फलंदाज झाले शून्यावर बाद

अँटिग्वा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विंडीजविरुद्ध पहिल्या कसाेटीच्या पहिल्याच डावात बांगलादेश संघाची दाणादाण उडाली. सहा फलंदाज शून्यावर बाद झाल्याने बांगलादेशला ३२.५ षटकांत अवघ्या १०३ धावांवर आपला पहिला डाव गुंडाळावा लागला. विंडीज संघाने दिवसअखेर पहिल्या डावात २ गड्यांच्या माेबदल्यात ९६ धावा काढल्या. टीमचा कर्णधार ब्रेथवेट (४२) आणि बाेनेर (१२) खेळपट्टीवर कायम आहे. विंडीज संघाचा आता माेठ्या खेळीचा प्रयत्न असेल.

नाणेफेक जिंकून विंडीज संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार ब्रेथवेटचा हा निर्णय गोलंदाज जायडेन सील्स आणि जोसेफने योग्य ठरवला. त्यांनी शानदार गोलंदाजी करताना प्रत्येकी तीन बळी घेतले. त्यामुळे बांगलादेशचा निम्मा संघ झटपट पॅव्हेलियनमध्ये परतला.

बातम्या आणखी आहेत...