आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट:बांगलादेशची विजयी हॅट्रट्रिक; वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडचा धुव्वा

ढाका8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालिका विजयाने फाॅर्मात आलेल्या बांगलादेश संघाने घरच्या मैदानावर मंगळवारी वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंड संघाचा टी-२० मालिकेत धुव्वा उडवला. यजमान बांगलादेश संघाने तिसऱ्या सामन्यात इंग्लंडचा १६ धावांनी पराभव केला. यासह बांगलादेश टीमने घरच्या मैदानावरील तीन टी-२० सामन्यांची मालिका ३-० ने आपल्या नावे केली. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाने २ बाद १५८ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाला निर्धारित २० षटकांत ६ गड्यांच्या माेबदल्यात १४२ धावांपर्यंत मजल मारता आली.

सामन्यामध्ये अर्धशतकी खेळी करणारा बांगलादेश टीमचा लिटन दास (७३) सामनावीर आणि नझमुल हुसेन (१४४) मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्यांची कामगिरी लक्षवेधी ठरली आहेे.

बातम्या आणखी आहेत...