आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेनियाचा लियाेनार्ड बार्साटेन आणि इथिपियाची डेसी जीसा रविवारी काेलकाता मॅरेथाॅनमध्ये चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. भारतीय गटामध्ये अभिषेक पालने सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला. त्याने १ तास १७ मिनिट ५२ सेकंदांमध्ये ही मॅरेथाॅन पुर्ण केली. बार्साेटनने पुरुषांच्या २५ िकमी मॅरेथाॅनमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्याने १ तास १२ मिनिट ४९ सेकंदामध्ये हे अंतर गाठले. यासह त्याने आपलाच २०१९ मधील विक्रम ब्रेक केला. त्याने यादरम्यान ही मॅरेथाॅन १ तास १३ मिनिट ५ सेकंदांत पूर्ण केली हाेती. इथिओपियाच्या जिसाने महिला गटात सुवर्णपदकावर नाव काेरले. तिने १ तास २१ मिनिट ४ सेकंदामध्ये ही मॅरेथाॅन पूर्ण केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.