आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारायगड जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे पुढच्या वर्षी राज्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन करणार आहे. या विद्यापीठाला २५ व्या क्रीडा महोत्सवाचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे तंत्रशास्त्र विद्यापीठ पहिल्यांदाच या क्रीडा महोत्सवाच्या यजमान पदाचे मानकरी ठरले आहे. यातून आता डिसेंबर २०२३ मध्ये राज्य क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या यजमानपदाचे पत्र राजभवनाकडून विद्यापीठाला मिळाले आहे. यामुळे आता विद्यापीठाने स्पर्धा आयाेजनाच्या तयारीला सुरुवात केली आहे.
३३ वर्षांपूर्वी स्थापना, २०१४ मध्ये संलग्नता रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. १९८९ पासून याची सुरुवात झाली. मात्र २०१४ मध्ये करण्यात आलेल्या कायद्यानुसार या तंत्रशास्त्र विद्यापीठाला संलग्नतेची अधिकृत अशी मान्यता जाहीर करण्यात आली. या विद्यापीठाला २५० पेक्षा अधिक महाविद्यालये संलग्नित आहेत. यासाठी सहा झोनमध्ये महाविद्यालयांचा विस्तार झाला आहे. या विद्यापीठाशी अभियांत्रिकी, औषधी निर्माण, हाॅटेल मॅनेजमेंट आणि वास्तु विशारद पदवी शिक्षण देणारे महाविद्यालय संलग्न आहेत.
पत्र मिळताच तयारीला सुरुवात; प्रशासन कामाला राजभवनच्या वतीने लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाला राज्य क्रीडा महोत्सवाच्या आयोजनाबाबतचे पत्र मिळाले आहे. हे पत्र मिळताच विद्यापीठ प्रशासनामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिल्यांदाच यजमानपद असल्याने भव्य आणि यशस्वीरीत्या स्पर्धा आयोजनाचे प्रशासनाने निश्चित केले आहे. यासाठीच आता तयारीला वेग आला आहे. विद्यापीठ प्रशासनाचे काही अधिकारी सध्या औरंगाबाद येथील राज्य क्रीडा स्पर्धेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे विद्यापीठाचे अधिकारी या स्पर्धेदरम्यान आयोजनाच्या बाबतीत सखोल निरीक्षण करत आहेत.
कुलगुरूंसह विद्यापीठाचे पथक औरंगाबादेत दाखल राज्य क्रीडा महाेत्सवाच्या आयाेजनाची माहिती व्हावी, यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. कारभारी काळे यांच्यासह चीफ काे-ऑर्डिनेटर शिवाजी कराड, बैरागी यांच्यासह अधिकारी औरंगाबादेत दाखल झाले. या पथकाने स्पर्धेच्या उद्घाटन साेहळ्यालाही खास हजेरी लावली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.