आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • BBC Woman Players Serve 1,068 British Players In 39 Sports; Opinions Expressed By All

बीबीसीचा महिला खेळाडूंवर सर्व्हे:39 खेळ प्रकारातील 1 हजार 68 ब्रिटिश खेळाडूंचा समावेश; सर्वांनी व्यक्त केली मते

लंडनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • साेशल मीडियावर 30% महिला खेळाडू ट्राेल; गतवर्षीपेक्षा आता तीनपट अधिक

मैदानावरील कामगिरीवर समाधानी असल्या तरी त्याबाहेर हाेत असलेली टवाळखाेरी ही जीवघेणी वाटत असल्याची प्रतिक्रिया महिला खेळाडूंनी दिली. याशिवाय बाहेर असताना अश्लील शेरेबाजीचा सामना करावा लागताे, अशा शब्दांत या खेळाडूंनी गाैप्यस्फाेट केला. याच प्रवृत्तीमधून ३० टक्क्यांपेक्षा अधिक महिला खेळाडू साेशल मीडियावर ट्राेल हाेतात. हे गतवर्षीपेेक्षा अधिक आहे. तसेच ५३ टक्के महिला खेळाडू क्लब व शासनाच्या निधीपासून वंचित आहेत.

पुरुषांसारखे पाठबळ नाही मिळत महिला प्लेयरला
प्रशासनाकडून मिळत असलेल्या साेयी-सुविधांच्या बाबतीतील पाठबळावर माेठ्या संख्येत महिला खेळाडूूंनी नाराजी व्यक्त केली. पुरुषांसारखेच पाठबळ मिळत नसल्याची खंतही त्यांनी बाेलून दाखवली.

- 53.3% महिला खेळाडूंच्या मते शासनाचा निधी पूर्णपणे मिळत नाही. २९% खेळाडूंना १०० टक्के शासनाचा निधी मिळाला आहे.

- 48.5% महिला खेळाडूंना प्रशासनाकडून पुुरुषांसारखा सपाेर्ट मिळत नाही. त्यामुळे अडचणी येतात. ४५ टक्के खेळाडूंच्या मते याबाबतची सुविधा मिळते.

- 84% महिला खेळाडूंनी दर्जेदार कामगिरीनुसार वेतन आणि बक्षिसाची रक्कम दिली जात नसल्याची खंत व्यक्त केली.

- 36% महिलांच्या मते बाळंतपण झाल्यावर पुन्हा मैदानावर कमबॅक करण्यासाठी प्रशासनाकडून मदत मिळत नाही. त्यामुळे करिअर साेडावे लागल्याचे म्हटले आहे.

महिला खेळाडूंचे मीडियावर प्रश्नचिन्ह
प्रसारमाध्यमेही कव्हरेज देताना महिला खेळाडूंच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करत असल्याचे म्हटले.

- 85% खेळाडूंच्या मते मीडिया काेणतेही पाठबळ देत नाही.

- 93% खेळाडूंच्या मते, महिला स्पर्धांच्या कव्हरेजकडील दुर्लक्ष पाच वर्षांपासून कायम आहे.

- 86% खेळाडूंच्या मते मीडिया पुुरुष व महिलांच्या स्पर्धांचे कव्हरेज वेगवेगळे करते.

करिअरमुळे ३५% खेळाडू उशिरा चढतात बाेहल्यावर
५३७ पैकी १८४ म्हणजेच जवळपास ३५ टक्के महिला खेळाडू करिअरमुळे उशिरा लग्न करून संसार थाटतात

- 60% खेळाडूंनी सांगितले की, मासिक पाळीमुळे कामगिरीचा दर्जा घसरताे. यामुळे खेळणे साेडून द्यावे लागल्याचे त्यांचे मत आहे.

- 40% महिला खेळाडू करिअरमध्ये मासिक पाळीबाबत आपल्या काेचसाेबत मनमाेकळेपणेे चर्चा करू शकत नाहीत.

- 21% महिला खेळाडू काेराेनामुळे आर्थिक संकटात.

- 78% खेळाडू आपल्या बॉडी इमेजमुळे कॉन्शियस आहे.

- 20% खेळाडूंना मतभेदाचा सामना करावा लागला.

- 65% खेळाडूंना शाेषणाला सामाेरे जावे लागले.

इलेक्ट्रॉनिक सर्वेक्षणात या खेळातील खेळाडू सहभागी
तिरंदाज, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, बॉबस्ले आणि स्केलेटन, बोसिया, कनोइंग, क्लाइंबिंग, क्रिकेट, कर्लिंग, सायकलिंग , डार्ट‌्सस, हाॅर्स रायडिंग, फेन्सिंग, फुटबॉल, गोलबॉल, गोल्फ, जिम्नॅस्टिक, हॉकी, हॉर्स रेसिंग, ज्युदो, मोटर स्पोर्ट‌्स, नेटबाॅल, रग्बी, सेलिंग, शूटिंग, स्केटबोर्डिंग, शॉर्ट-ट्रॅक आणि फिगर स्केटिंग, स्कीइंग आणि स्नोबोर्डिंग, स्क्वॉश, सर्फिंग, स्विमिंग, डायविंग, टेबल टेनिस, तायक्वांदाे, टेनिस, ट्रायथलॉन, वेटलिफ्टिंग.

बातम्या आणखी आहेत...