आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएलमध्येही चीनचा बायकॉट:चायनीज कंपनी व्हिव्होसोबतचा करार स्थगित, बीसीसीआयकडून अधिकृत घोषणा; 2021 ते 2023 दरम्यान नवीन करार होऊ शकतो

मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयपीएलची टायटल स्पॉन्सर व्हिव्होकडून बीसीसीआयला वार्षिक 440 कोटी रुपये मिळतात

चायनीज मोबाइल कंपनी व्हिव्हो या वर्षी आयपीएलची टाइटल स्पॉन्सर नसेल. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने गुरुवारी कंपनीसोबतचा करार स्थगित केला आहे. व्हिव्होने 2018 मध्ये 2190 कोटी रुपयांत 5 वर्षांसाठी आयपीएलची टाइटल स्पॉन्सरशिप डील मिळवली होती. हा करार 2022 मध्ये संपणार होता. या कराराअंतर्गत व्हिव्हो बीसीसीआयला दरवर्षी 440 कोटी रुपये देत असे.

'गव्हर्निंग काऊन्सीलच्या बैठकीनंतर आम्ही आणि व्हिव्होच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली. या चर्चेअंती एका वर्षासाठी कंपनी स्पॉन्सर नसणार, हे ठरले. दोन्ही बाजूंनी सामोपचाराने यावर निर्णय घेतला आहे. या वर्षाच्या मोबदल्यात व्हिविहो कंपनीसोबतचा करार 2023 पर्यंत वाढवता येईल का याची चाचपणी बीसीसीआय करणार आहे,' असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.

व्हिव्हो आणि बीसीसीआयमध्ये नवीन करार होऊ शकतो

आता बीसीसीआय यावर्षी नवीन टायटल स्पॉन्सरसाठी टेंडर जारी करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएल आणि व्हिव्होमध्ये पुढील वर्षी 2021 ते 2023 पर्यंत नवीन करार होऊ शकतो.

आरएसएससह अनेक संघटना व्हिव्होच्या विरोधात होत्या

यावर्षी आयपीएल यूएईमध्ये 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत होणार आहे. टुर्नामेंट सुरू होण्यापूर्वीच राष्ट्रीय स्वंयसेवक संघासह अनेक संघटनांनी आयपीलला बॉयकॉट करण्याची मागणी केली होती. संघाशी संबंधित स्वदेशी जागरण मंचचे राष्ट्रीय सह-संयोजक अश्विनी महाजन म्हणाल्या होत्या की, ‘‘जेव्हापासून गलवान घाटीत आमचे 20 जवान शहीद झाले, तेव्हापासून चीन आणि चीनी कंपन्यांविरोधात देशात आंदोलने होत आहेत. अशात आयपीएलने चीनी कंपनीला स्पॉन्सर बनवले. यातून त्यांची भावना चुकीची असल्याचे दिसते. कंपनीसोबत करार रद्द केला नाही, तर आमच्याकडे आयपीएलला बॉयकॉट करण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल. ’’