आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
टीम इंडियाने ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाला 7 विकेट्सनी पराभूत इतिहास रचला. भारताने ऑस्ट्रेलियात आपले सर्वात मोठे 328 धावांचे लक्ष्य पूर्ण केले आणि चौथा कसोटी सामना जिंकून मालिका 2-1 ने खिशात घातली. भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी मोठा बोनस जाहीर केला आहे. बीसीआयचे सेक्रेटरी जय शाह यांनी यासंदर्भात घोषणा केली. बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन भारतीय संघाला बोनस जाहीर झाल्याची घोषणा केली.
"The BCCI has announced INR 5 Crore as team bonus"- BCCI Secretary Mr @JayShah tweets.#TeamIndia pic.twitter.com/vgntQuyu8V
— BCCI (@BCCI) January 19, 2021
ब्रिस्बेनमध्ये तीन दशकांनंतर ऑस्ट्रेलियाचा पराभव
भारताने ऑस्ट्रेलियाला 7 विकेट्सनी पराभूत इतिहास रचला. भारताने ऑस्ट्रेलियात आपले सर्वात मोठे 328 धावांचे लक्ष्य पूर्ण केले आणि चौथा कसोटी सामना जिंकून मालिका 2-1 ने खिशात घातली. याआधी भारताने 2003 च्या एडिलेट कसोटीत 233 धावांचे सर्वात मोठे लक्ष्य पार केले होते. यजमान ऑस्ट्रेलियाने 32 वर्षानंतर ब्रिस्बेनमध्ये पहिल्यांदाच कसोटी गमावली आहे. मागील वेळी ब्रिस्बेनमध्ये नोव्हेंबर 1988 मध्ये वेस्टइंडीजने 9 गड्यांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. 1988 नंतर ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेनमध्ये 31 कसोटी सामने खेळले होते, त्यातील 24 जिंकले आणि 7 अनिर्णित राहिले.
भारताने गाबामध्ये पहिली कसोटी जिंकली
तर भारतीय संघाने ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर पहिला कसोटी सामना जिंकला आहे. या सामन्याआधी टीम इंडियाने 6 कसोटी सामने खेळले होते, त्यातील 5 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता आणि एक अनिर्णित राहिला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.