आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • BCCI President Sourav Ganguly Said The Women's IPL Or The Challenger Series, As It Is Better Known, Is Very Much On

आयपीएलसोबत वुमन टी-20 लीग:आयपीएलदरम्यान महिलांची टी-20 लीग होईल, 1 ते 10 नोव्हेंबरदरम्यान सामने होऊ शकतात- सौरव गांगुली

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

यूएईमध्ये आयपीएलदरम्यान महिलांची टी-20 लीग किंवा चॅलेंजर सीरिज खेळवली जाणार आहे. ही माहिती बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने रविवारी दिली. गांगूलीने यादरम्यान या टुर्नामेंटच्या शेड्यूलचा खुलासा केला नाही. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आयपीएलच्या लास्ट फेजमध्ये 1-10 नोव्हेंबरदरम्यान वुमेंस चँलेंजर सीरीज होऊ शकते.

वुमेंस टी-20 चॅलेंज पहिल्यांदा 2018 मध्ये खेळवण्यात आला होता. तेव्हा एकच सामना झाला होता, त्यात सुपरनोवाजने ट्रेल ब्लेजर्सला हरवले होते. 2019 मध्येही बीसीसीआयने आयपीएलदरम्यान महिलांच्या तीन संघात 4 टी-20 सामने खेळवले होते. यावर्षी यूएईमध्ये आयपीएल 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. अद्याप याचा अंतिम शेड्यूल ठरलेला नाही.

याविषयी बोलताना गांगुली म्हणाला की, “मी एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगू शकतो की, महिलांसाठी आयपीएलवरही आमचा विचार सुरू आहे. भारतीय महिला संघासाठीही आम्ही काही प्लॅन ठरवले आहेत. हे सर्व झाल्यानंतर याची घोषणा करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...