आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • BCCI Strict Order To Players Consider Yourself Out Of England Tour If You Test Corona Positive In Mumbai

कोरोना झाला तर संघातून बाहेर:कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्यास इंग्लंड दौऱ्यातून बाहेर; BCCI चे खेळाडूंना निर्देश

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंग्लंडला जाण्यापूर्वी दोन निटेटिव्ह चाचण्या गरजेच्या

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या खेळाडूंना कडक शब्दात निर्देश दिले आहेत. बोर्डाने म्हटले की, इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी एखादा खेळाडून कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास, त्याला संघातून बाहेर केले जाईल. टीमचे फीजियो योगेश परमारने खेळाडूंना म्हटले की, मुंबईमध्ये क्वारंटाइन होण्यापूर्वी सावध रहा आणि स्वतःला आयसोलेट करा. भारतीय संघ 19 मे रोजी मुंबईत बायो-बबलमध्ये एंट्री करेल. यानंतर इंग्लंडमध्ये गेल्यावर पुन्हा दहा दिवस क्वारंटाइनमध्ये रहावे लागेल.

हॉटेलमध्ये प्रवेश करताच कोरोना चाचणी होईल
बायो-बबलमध्ये एंट्री झाल्यानंतर भारतीय खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि त्यांच्या कुटुंबियांची पहिलाय दिवशी कोरोना चाचणी होईल. यासोबतच BCCI खेळाडूंसाठी एक स्पेशल बायो-बबल तयार करणार आहे. असे यामुळे, कारण इंग्लंड टुरवर जाणाऱ्या 20 खेळाडूंची राज्ये वेगवेगळी आहेत आणि प्रत्येक राज्यात कोरोनाची वेगळी परिस्थिती आहे.

कोणत्याच खेळाडूसाठी वेगळी चार्टर्ड फ्लाइट नाही

BCCI च्या एका अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितल्याप्रमाणे, बोर्डाने खेळाडूंना कठोर शब्दात निर्देश दिले आहेत. खेळाडूंना हेदेकील सांगण्यात आले आहे की, मुंबईमध्ये कोरोना पॉजिटिव्ह आल्यानंतर एखाद्या ठराविक खेळेडूला स्वतंत्र चार्टर्ड प्लेनने इंग्लंडला पाठवले जाणार नाही. IPL 2021 मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर बोर्ड अजून सावध झाला आहे.

इंग्लंडला जाण्यापूर्वी दोन निटेटिव्ह चाचण्या गरजेच्या
अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, खेळाडूंसह त्यांच्या कुटुंबियांची चाचणी केली जाईल. मुंबईतून इंग्लंडला जाण्यापूर्वी खेळाडूंना दोन निटेटिव्ह चाचण्या गरजेच्या असतील. तसेच, बोर्डाने खेळाडूंना खासगी कार आणि विमानानेच प्रवास करण्याचे निर्देश दिले आहेत.

बोर्डाने फक्त कोवीशील्ड लस घेण्यास सांगितले

बोर्डाने इंग्लंड टूरवर जाणाऱ्या खेळाडूंना फक्त कोवीशील्ड लसीचा पहिला डोस घेण्याचे निर्देश दिले आहेत. दुसऱ्या डोससाठी इंग्लंडमध्ये व्यवस्था केली जाईल. इंग्लंडमध्ये अॅस्ट्रेजेनेका व्हॅक्सीन उपलब्ध आहे. ही लस कोवीशील्डचे व्हर्जन आहे. भारतात कोव्हॅक्सिन घेतल्यास इंग्लंडमध्ये अॅस्ट्रेजेनेका देता येणार नाही, त्यामुळे फक्त कोवीशील्ड घेण्यास सांगितले आहे.

भारतीय संघ तीन महिने इंग्लंडमध्ये राहणार

18 जूनपासून सुरू होणाऱ्या पहिल्या ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या फायनलमध्ये भारतासमोर न्यूजीलंडचे आव्हान आहे. हे सामने 18 जूनपासून 22 जूनदरम्यान साउथैम्पटनच्या द एजीस बाउल (द रोज बाउल) स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. यानंतर दिड महिना इंग्लंडमध्ये राहिल्यानंतर 4 ऑगस्टपासून इंग्लंडसोबत टेस्ट सीरिज आहे.

BCCI बनवणार बायो सिक्योर बबल

भारतीय मेन्स टीमसह वुमन्स टीमदेखील इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. वुमन्स टीम इंग्लंडमध्ये 16 जून ते 15 जुलैदरम्यान 1 टेस्ट, 3 वनडे आणि 3 टी-20 खेळेल. त्यामुळेच, BCCI स्वतः इंग्लंडमध्ये बायो सिक्योर बबल तयार करेल.

बातम्या आणखी आहेत...