आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • BCCI Won't Have To Face Financial Crisis Due To Cancellation Of VIVO Deal: Ganguly

आयपीएलमध्ये चीनचा बायकॉट:VIVO सोबतचा करार रद्द झाल्यामुळे बीसीसीआयला आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही- सौरव गांगुली

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीन दिवसांपूर्वीच बीसीसीआयने व्हिव्होची टायटल स्पॉन्सरशिप डील सस्पेंड केली आहे
  • नव्या स्पॉन्सरच्या रेसमध्ये बायजू, अॅमेझॉन, रिलायंस जिओ आणि कोका-कोला इंडिया आहे

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली ने सांगितले की, चायनीज मोबाईल कंपनी व्हिव्हो(VIVO)चा आयपीएल सोबतची टायटल स्पॉन्सरशिप डील सस्पेंड झाल्याने बोर्डाला कोणत्याच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही. एका वेबिनारदरम्यान गांगुलीने ही माहिती दिली.

बीसीसीआयने गुरुवारी व्हिव्होसोबत यावर्षीचा आयपीएल टायटल स्पॉन्सरशिप कॉन्ट्रॅक्ट स्थगित करण्याचा निर्णय घेला आहे. भारत-चीनमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत भारतीय जवान शहीद झाले होते. तेव्हापासून चीनी कंपन्यांचा बहिष्कार करण्याची मागणी देशभरातून सुरू होती. याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट बोर्डाने चीनी कंपनीसोबतचा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

बोर्ड चांगल्या स्थितीत- गांगुली

गांगुलीने सांगितले की, बीसीसीआय चांगल्या स्थितीत आहे. खेळाडू आणि अॅडमिनिस्ट्रेटर्सने ने मागील काही वर्षात या खेळाला इतक्या चांगल्या स्थितीत आणले आहे की, करार रद्द झाल्यामुळे बोर्डावर याचा फारसा परिणाम पडणार नाही. अशा परिस्थितीतून बाहेर येण्यसाठी बोर्डाकडे प्लॅन- बी तयार असतो.

डील रद्द झाल्यामुळे फ्रेंचाइजींना 27.5 कोटींचे नुकसान

व्हिव्होने 2018 मध्ये 2,190 कोटी रुपयांमध्ये 5 वर्षांसाठी आयपीएलची टायटल स्पॉन्सरशिप डील मिळली होती. हा करार 2022 मध्ये संपणार होता. या करारा अंतर्गत व्हिव्हो बीसीसीआयला दरवर्षी 440 कोटी रुपये देत आहे. यातील अर्धी रक्कम सर्व संघात समान वाटली जाते. प्रत्येक संघाला 27.5 कोटी रुपये मिळतात. त्यामुळे यावर्षी हा करार रद्द झाल्याने संघाचे नुकसान होत आहे.

बायजू नवीन टायटल स्पॉन्सरच्या रेसमध्ये सर्वात पुढे

आयपीएलच्या नवीन टायटल स्पॉन्सरच्या रेसमध्ये बायजू, अॅमेझॉन, रिलायंस जिओ आणि कोका-कोला इंडिया आहे. परंतू, कोरोनामुळे कंपन्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत बोर्डाला 440 कोटी रुपये मिळणे अवघड आहे. बायजू भारतीय संघाचा स्पॉन्सर असल्यामुळे आयपीएलच्या स्पॉन्सरशिपच्या रेसमध्ये बायजू सर्वात पुढे आहे.

बातम्या आणखी आहेत...