आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • BCCI's Flap Of Discrimination Band; The 'financial' Gap Between Men's And Women's Teams Still Remains

महिला दिन विशेष:बीसीसीआयचा भेदभाव बंदचा फ्लाॅप शाे; अद्यापही पुरुष व महिला संघांतील ‘आर्थिक’ अंतर कायम

एकनाथ पाठक | औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ३३ टी-२० सामन्यांतून १०.८ कोटी, २ कसोटींतून ३.३० कोटी कमावणार - एकूण ३१.९२ कोटींची मिळकत पुरुष संघाची वर्षात १८ वनडेंमधून ११.८ कोटी, २० टी-२० मधून १.३२ कोटी, ७ कसोटींतून १०.५ कोटी कमाई

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंमधील भेदभाव संपुष्टात आणल्याची घोषणा करून धमाल उडवून दिली, पण खरोखरच महिला क्रिकेटरसाठी हा निर्णय फ्लॉप ठरला आहे. भारतीय पुरुष संघासोबत आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी महिला संघाला खडतर आव्हान पेलावे लागणार आहे. बीसीसीआय येत्या तीन वर्षांत महिला संघाला ६२ सामन्यांमधून ३१.९२ कोटी रुपये देणार आहे. पण पुरुष संघ एका वर्षात ४५ सामन्यांतून २७.७० कोटी कमावणार आहे. समसमानची घोषणा करूनही बीसीसीआयने आपल्या महिला क्रिकेटरकडे दुर्लक्ष करण्याची सवय सोडलेली नाही. भारतीय पुरुष संघ एका वर्षात ४५ आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. मात्र महिला संघाला ६२ आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी चार वर्षे वाट पाहावी लागणार आहे. बीसीसीआय आता पुरुष आणि महिला संघाला टी-२० साठी ३ लाख रुपये, वनडेसाठी ६ लाख रुपये आणि कसोटीसाठी १५ लाख रुपये देणार आहे.

महिला दिन विशेष : भारतीय महिला संघाची २७ वनडे सामन्यांतून १७.८२ कोटींची कमाई
महिलांची २०२४ च्या विश्वचषकाची तयारी; ८ दिवसांनी पुरुष संघही सुरू करणार सराव

फेब्रुवारीत आयसीसीचा टी-२० विश्वचषक पार पडला. यानंतर सप्टेंबर २०२४ मध्ये महिलांचा दुसरा टी-२० विश्वचषक होणार आहे. मात्र या विश्वचषकाची तयारी सुरू करण्यासाठी भारतीय महिला संघाला ९० दिवस वाट पाहावी लागणार आहे. यानंतर महिला संघ तयारीसाठी मालिका खेळणार आहे. भारतीय महिला संघाची टी-२० मालिका जून २०२३ मध्ये बांगलादेशमध्ये होणार आहे. यानंतर २०२४ च्या विश्वचषकाची तयारी सुरू होणार आहे. भारतीय महिला संघाची टी-२० मालिका जून २०२३ मध्ये बांगलादेशमध्ये होणार आहे. यानंतर २०२४ च्या विश्वचषकाची तयारी सुरू होणार आहे. या तयारीसाठी भारतीय महिला संघ पाच टी-२० मालिका खेळणार आहे. पण दुसरीकडे भारतीय पुरुष संघाने अवघ्या ८ दिवसांत वनडे आणि टी-२० विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे. १० नोव्हेंबर २०२२ रोजी इंग्लंडने टीम इंडियाचा उपांत्य फेरीत पराभव केला. आता १८ नोव्हेंबरपासून टीम इंडिया २०२४ वर्ल्ड कपच्या तयारीसाठी न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे.

कसोटी विजयाच्या प्रतीक्षेत
भारतीय महिला संघाचा कसोटी सामना पूर्णपणे फ्लॉप ठरत आहे. कसोटी सामने आयोजित करण्याकडे दुर्लक्ष हे त्याचे प्रमुख कारण ठरले आहे. त्यामुळे भारतीय महिला संघाला २०१४ नंतर कसोटी विजयाची प्रतीक्षा आहे.

विश्वचषक स्पर्धेनंतर महिला आयपीएल
गेल्या महिन्यात बीसीसीआयच्या नेतृत्वात मोठा बदल झाला. रॉजर बिन्नी अध्यक्ष झाले. अरुण धुमाळ यांना आयपीएलचे आयुक्त करण्यात आले. महिलांच्या आयपीएल स्पर्धेसाठी त्यांची घोषणा करण्यात आली. पण महिलांच्या टी-२० वर्ल्डकपनंतर आयपीएल होणार आहे. पुरुष संघ आयपीएलच्या माध्यमातून टी-२० विश्वचषकाची तयारी करत आहे.

भारतीय महिलांच्या कसोटीला मिळाला ब्रेक; संघ २६ महिने २७ दिवसांनी कसोटी सामना खेळणार
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंमधील भेदभाव संपवण्याच्या दिशेने पुढे जाण्याचे नाटक करत आहे. तरीही मंडळाने अनभिज्ञता कायम ठेवली. या भेदभावामुळे भारतीय महिला संघाच्या कसोटी क्रिकेटला वाईट दिवस आले आहेत. भारतीय महिला संघ २६ महिने, २७ दिवसांनी कसोटी सामना खेळणार आहे. भारतीय महिला संघाने चार वर्षांत केवळ दोन कसोटी सामने खेळले आहेत. दुसरीकडे भारतीय पुरुष संघ एकाच वर्षात सात कसोटी सामने खेळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...